Full Width(True/False)

Samsung Galaxy F12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळताहेत जबरदस्त ऑफर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. Samsung Galaxy F12 देशात १०,९९९ रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लाँच झाला आहे. हा बजेट फोन सॅमसंगकडून ऑफर आणि डीलमध्ये खरेदी करू इच्छित असाल तर ही चांगली संधी आहे. हा हँडसेट सध्या ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वरून नो कॉस्ट ईएमआय आणि बर्‍याच बँक ऑफरसह खरेदी करता येईल. Samsung Galaxy F12 मध्ये दक्षिण कोरियन कंपनीने ६००० एमएएच बॅटरी, ४८ मेगापिक्सेल कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये दिली आहे. वाचा : Samsung Galaxy F12: किंमत आणि ऑफर Samsung Galaxy F12 च्या ४ जीबी रॅम आणि १४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे असून त्यावर १०,४५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. तर, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ११,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून यावर ११,२०० रुपयांची सूट मिळत आहे. इतर ऑफर्सबद्दल सांगायचे तर तुम्हाला येस बँक क्रेडिट कार्डसह ईएमआयवर फोन खरेदी करण्यावर ७ टक्के त्वरित सूट मिळेल. फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डवर २० टक्के अमर्यादित कॅशबॅक उपलब्ध असेल. दुसरीकडे, आयसीआयसीआय, इंडसइंड, एसबीआय आणि मोबिकविक यांनी जारी केलेल्या अ‍ॅमेक्स नेटवर्क कार्डवर फोन खरेदी केल्यास २० टक्के सूट मिळेल. २००० रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर फोन खरेदी करता येईल. आयसीआयसीआय डेबिट कार्डासह फोन खरेदी करणाऱ्यांना १००० रुपयांचीअतिरिक्त सूट दिली जात आहे. Samsung Galaxy F12 वैशिष्ट्य Samsung Galaxy F12 स्मार्टफोन अँड्रॉइड ११ बेस्ड वन यूआय ३.१ कोरसह आला असून फोनमध्ये ६.५ इंच एचडी + इन्फायनाईट -व्ही डिस्प्ले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो २०:९ आणि रीफ्रेश दर ९० हर्ट्ज आहे. हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर एक्सीनोस ८५० प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनमध्ये ६४ जीबी आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे जो ४८ मेगापिक्सेल प्रायमरी, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल , २ मेगापिक्सेल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसरसह सुसज्ज आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Samsung Galaxy F12 मध्ये ४ जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस / ए-जीपीएस आणि ३.५ मिमी हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फिंगरप्रिंट सेन्सर स्मार्टफोनच्या काठावर उपस्थित आहे. Samsung Galaxy F12 मध्ये ६००० एमएएच बॅटरी आहे. जी, १५ डब्ल्यू चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा : वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35WJr0k