Full Width(True/False)

प्रतिक्षा संपणार! स्वस्त Jio Phone 5G सोबत Jio Laptop देखील होणार लाँच

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी लवकरच देशात सर्वात स्वस्त ५जी आणि लॅपटॉप लाँच करणार आहे. या दोन्ही प्रोडक्ट्समध्ये दमदार फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. २४ जूनला होणाऱ्या मध्ये कंपनी आपल्या या प्रोडक्ट्सवरून पडदा हटवू शकते. रिलायन्सच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारणसभेत रिलायन्स नेक्स्ट जनरेशन जिओ फोन्ससोबत स्वस्त आणि लॅपटॉप सादर केले जाऊ शकतात. वाचाः रिलायन्सने मुंबई ५जी ट्रायल सुरू केले आहे व नोकिया, सॅमसंर आणि एरिक्सनसोबत चर्चा करत इतर शहरांमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी ट्रायल सुरू करण्याचा विचार आहे. भारतात ५जी नेटवर्कची सुरुवात होताच, एअरेटल आणि जिओ आपल्या ग्राहकांसाठी ५जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणार असल्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त गेल्या काही महिन्यात अनेक जबरदस्त ५जी स्मार्टफोन्स लाँच होत आहे. वाचाः १५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये चांगले ५जी स्मार्टफोन्स मिळत आहे. मात्र रिलायन्स ५जी सेगमेंट मार्केटमध्ये उतरत सर्वांना धक्का देण्याची शक्यता आहे. रिलायन्सचा अपकमिंग जिओफोन ५जी हा ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वस्त ५जी फोन आणि लॅपटॉप रिलायन्सने गेल्या एजीएममध्ये घोषणा केली होती की, गुगलच्या मदतीने भारतात स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. यासोबतच जिओचा स्वस्त लॅपटॉप JioBook देखील लाँच होईल. महागडे लॅपटॉप खरेदी करू न शकणाऱ्यांसाठी जिओबूकला लाँच केले जाणार आहे. रिपोर्टनुसार, जिओबुकचे स्क्रीन रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल असेल आणि यात Qualcomm Snapdragon ६६५ SoC प्रोसेसर मिळेल. जिओबुक २ जीबी/४जीबी रॅम आणि ३२जीबी/६४जीबी स्टोरेजसह येऊ शकतो. यात जिओची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम असेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qb7NNd