नवी दिल्ली : एअरटेल, आणि बीएसएनएलला टक्कर देण्यासाठी रिलायन्स एकापेक्षा एक दमदार प्लान्स आणत आहे. आता कंपनीने प्रीपेड प्लान्स आणले आहेत. या डेटा प्लान्समध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा वापरता येतो. सोबतच, यात मोफत कॉलिंगची देखील सुविधा मिळेल. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः Jio १२७ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये १५ दिवसांसाठी १२ जीबी डेटा मिळतो. यूजर्स कोणत्याही लिमिटशिवाय हा डेटा वापरू शकतात. तसेच, यात मोफत कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. Jio चा २४७ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ३० दिवस आहे. यात यूजर्सला २५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. यूजर्स कोणत्याही लिमिटशिवाय हा डेटा वापरू शकतात. तसेच, यात मोफत कॉलिंग आणिजिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. Jio चा ४४७ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये ६० दिवसांसाठी एकूण ५० जीबी डेटा मिळेल. यूजर्सला विना लिमिट हा डेटा वापरता येईल. यात मोफत कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वाचाः Jio चा ५९७ रुपयांचा प्लान जिओच्या या डेटा प्लानमध्ये ७५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस, मोफत कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यूजर्स कोणत्याही लिमिटशिवाय हा डेटा वापरू शकतील. या प्लानची वैधता ९० दिवस आहे. Jio चा २,३९७ रुपयांचा प्लान जिओचा हा डेटा प्लान महाग असून, यात यूजर्सला ३६५ जीबी डेटा दिला जातो. या व्यतिरिक्त मोफत कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यूजर्स कोणत्याही लिमिटशिवाय हा डेटा वापरू शकतात. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pJOzhk