Full Width(True/False)

KKK 11- अनुष्का सेनला करोनाची लागण, मेकर्सची चिंता वाढली

मुंबई: करोनाच्या संक्रमणाचं प्रमाण सध्या देशात कमी होत असलं तरीही अनेक लोकांना अद्यापही करोनाची लागण होताना दिसत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रेटींना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता हा ''च्या सेटवरही जाऊन पोहोचला आहे. या शोची स्पर्धक अनुष्का सेनला करोनाची लागण झाली आहे. या शोचं शूटिंग सध्या केप टाउनमध्ये सुरू आहे. पण सर्व नियमांचं पालन करून आणि योग्य ती सर्व काळजी घेतल्यानंतरही आता अनुष्काला करोनाची लागण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्काला करोनाची कोणतीही लक्षणं दिसली नव्हती मात्र तिची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अभिनेत्री सध्या क्वारंटाइन आहे पण तिची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र मेकर्सची चिंता वाढली आहे. या शोमधील इतर स्पर्धकही आता सावध झाले आहेत. सर्वाच्या करोना टेस्ट करण्यात आल्या होत्या पण सुदैवानं अनुष्का वगळता इतर सर्वांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अनुष्का सेन या शोमधून एलिमिनेट होऊन बाहेर पडल्याचं बोललं जात होतं. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मेकर्सनी दिली नव्हती. पण आता करोना झाल्यामुळे अनुष्काला शोमधून बाहेर केलं जाऊ शकतं किंवा मग ती ठीक झाल्यांनंतर शोचं शूट सुरू केलं जाईल असा अंदाज लावला जात आहे. 'खतरों के खिलाडी'च्या या ११ व्या सीझनमध्ये यावेळी राहुल वैद्य, निक्की तांबोळी, अभिनव शुक्ला, सौरभ राज जैन, आस्था गिल, सना मकबूल, महक चहल, वरुण सूद, दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंह याचा समावेश आहे. तर दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिग्दर्शक रोहित शेट्टी हा शो होस्ट करणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iNDBpJ