Full Width(True/False)

'The Family Man' च्या सूचीला शाहरुखने दिलेले ३०० रुपये

मुंबई- '' ही वेबसीरिज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या वेब सीरिजमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारी दाक्षिणात्य अभिनेत्री हिच्या अभिनयाचं देखील प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे. परंतु, यापूर्वी प्रियामणी बॉलिवूड अभिनेता सोबत पडद्यावर झळकली आहे. प्रियामणीने शाहरुखसोबत '' चित्रपटातील 'गेट ऑन दी डान्स फ्लोअर' या गाण्यावर डान्स केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणीने शाहरुखसोबत काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं. 'गेट ऑन दी डान्स फ्लोअर' या गाण्यातील शाहरुख आणि प्रियामणी यांची जोडी प्रेक्षकांना पसंत पडली होती. शिवाय या गाण्यातील स्टेप्सदेखील चाहत्यांना आवडल्या होत्या. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखने प्रियामणीला ३०० रुपये दिल्याचं देखील प्रियामणीने मुलाखतीत सांगितलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणी म्हणाली, 'शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. मी एक माणूस म्हणून त्यांची चाहती आहे. ते देशातील मोठ्या सुपरस्टार पैकी एक आहेत पण त्यांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नाहीए. त्यांच्यासोबत बोलताना तुम्हाला या गोष्टीची जाणीवदेखील होणार नाही की तुम्ही बॉलिवूडच्या बादशाहसोबत बोलत आहात.' सेटवरील गमतीजमती सांगताना प्रियामणी म्हणाली, 'शाहरुख ब्रेकमध्ये सुद्धा स्टेप्स शिकायचे. जराही वेळ वाया जाऊ देत नव्हते. मी गाण्याच्या चित्रीकरणाच्या एक दिवस आधी सेटवर पोहोचले होते. त्यांनी पहिल्या दिवसापासून आमची काळजी घेतली. आम्ही त्यांच्या आयपॅडवर 'कौन बनेगा करोडपती' खेळलो. जेव्हा मी जिंकली तेव्हा त्यांनी स्वतः मला ३०० रुपये दिले होते. मी आजही ते पैसे सांभाळून ठेवले आहेत. ते खूप मेहनती अभिनेते आहेत. त्यांची कामासाठी असलेली निष्ठा पाहून मी त्यांची मोठी चाहती झाले.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gHH5Ht