Full Width(True/False)

स्मार्टफोन बिझनेस बंद केल्यानंतर LG कंपनीची आणखी एक सेवा यावर्षी बंद होणार, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : एलजीने या वर्षी एप्रिल महिन्यात स्मार्टफोन बिझनेस बंद करत असल्याची घोषणा केली होती. आता कंपनी पेमेंट सर्व्हिस देखील बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने ही पेमेंट सेवा त्यांच्याच स्मार्टफोनसाठी उपलब्ध केली होती. कंपनीने पे च्या वेबसाइटवर देखील ही सेवा बंद करत असल्याची माहिती दिली आहे. वाचा : एलजी पे चे मौल्यवान ग्राहक असल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला हे सांगण्यात खेद होत आहे की २०२१ च्या उर्वरित काळात आम्ही एलजी पे सेवा बंद करत आहोत. अधिक माहिती पुढे आहे, असे कंपनीने वेबसाइटवरील मेसेजमध्ये म्हटले आहे. मात्र कंपनीने ही सेवा कधी बंद करत आहे, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेले नाही. Pay यूजर आता एलजीच्या स्मार्टफोनमध्ये वापरू शकतील. तसेच, एलजी स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले मॅग्नेटिक फीचर देखील पे मध्ये काम करणार नाही. वाचा : एलजीने २०१७ मध्ये गुगल आणि सॅमसंगच्या पेमेंट अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी स्वतःची पेमेंट सेवा सुरू केली होती. २०१८ मध्ये कंपनीने ही सेवा मिड रेंज स्मार्टफोनमध्ये उपलब्ध केली होती व त्यानंतर २०१९ मध्ये मॅग्नेटिक स्ट्रिप सपोर्टसह ही सेवा अमेरिकेत लाँच केली होती. दरम्यान, एलजीने मोबाइल विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी वेंडर्सकडे उपलब्ध असलेले स्मार्टफोन खरेदी करता येईल. तसेच, कंपनीने आश्वासन दिले आहे की ओएस आणि सॉफ्टवेअर अपडेटसोबत सेल्स सर्व्हिस देखील ग्राहकांना मिळेल. आणि वायरलेस ब्लूटूथ स्पीकर्सचे उत्पादन आणि विक्री सुरूच राहणार आहे. तर केवळ स्टॉक्समध्ये असलेल्या फोन्स आणि टॅबलेटची विक्री होईल. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pfFBs0