Full Width(True/False)

आता स्मार्टवॉचमध्ये घ्या मोबाइलचा आनंद, ३६ तास बॅटरी लाइपसह Meizu Watch लाँच

नवी दिल्ली : लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी ने आपली एक नवीन Meizu Watch ला लाँच केले आहे. हे स्मार्ट वॉच सपोर्ट सोबत येते. ई-सिम सपोर्टसह येणाऱ्या या स्मार्टवॉचवरून तुम्हाला कॉल, मेसेजसह अनेक सुविधा वापरता येतील. त्यामुळे हे स्मार्टवॉच लोकप्रिय ठरू शकते. Meizu ने काही दिवसांपूर्वीच स्मार्टफोनला देखील लाँच केले होते. या वॉचमध्ये ३६ तास बॅटरी लाइफ, शानदार आणि आकर्षक डायलसोबत Qualcomm Snapdragon ४१०० Wear प्रोसेसर देण्यात आले आहे. वॉच फीचर्स आणि लूकच्या बाबतीत प्रीमियम वाटते. वाचाः किंमत जास्त नाही ला सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आले असून, भारतासह इतर देशांमध्ये लवकरच लाँच केले जाण्याची शक्यता आहे. चीनमध्ये वॉचची किंमत १,४९९ युआन (जवळपास १७,११७ रुपये) आहे. वॉचला Black आणि Azure रंगात लाँच करण्यात आले असून, १ जूनपासून विक्री सुरू झाली आहे. हे वॉच अॅपल, आणि हुवावे सारख्या कंपन्यांच्या डिव्हाइसला टक्कर देईल. वाचाः फीचर्सच्या बाबतीत अन्य कंपन्यांच्या स्मार्टवॉच पेक्षा खूप पुढे आहे. कारण तुम्ही या वॉचला स्मार्टफोन प्रमाणे वापरू शकता. यात ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, ब्रिदिंग ट्रेनिंग, स्लिपिंग ट्रॅकिंग, ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट सेंसर आणि फिटनेस ट्रॅकिंगसह अनेक फीचर्स मिळतात. Meizu Watch च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर या स्मार्टवॉचमध्ये १.७८ इंचचा AMOLED डिस्प्ले आहे, जो २.५ D कॉर्निंग गोरिल्ला ग्लासने सुरक्षित आहे. स्मार्टवॉचचे स्क्रीन रिझॉल्यूशन ३६८x४४८ पिक्सल आहे. वॉचमध्ये फिजिकल बटन देखील मिळते, ज्याच्या मदतीने फिजिकल बटन वापरता येतात. Flyme OS सोबत येणाऱ्या वॉचमध्ये अनेक फेस वॉच आहेत, ज्यात तुम्ही कस्टमाइज करू शकता. यात ४२०एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे सिंगल चार्जमध्ये ३६ तास सहज टिकेल. केवळ १५ मिनिटांच्या चार्जिंगवर याचा दिवसभर वापर करता येईल. याच्या बॉडीला स्ट्रॅपपासून वेगळे करून कोणत्याही सी-टाइप चार्जरद्वारे चार्जिंग करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wPPors