Full Width(True/False)

येत आहे Oppo चा नवीन स्मार्टफोन, फोनमध्ये 120Hz डिस्प्ले आणि Snapdragon 768G प्रोसेसर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी लवकरच बाजारपेठेत एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये, युजर्सना अनेक वैशिष्ट्ये मिळतील. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये ४५०० mAh ची बॅटरी देण्यात येईल. जी, ५०W फास्ट चार्जिंगला समर्थन देईल. अशा प्रकारच्या वैशिष्ट्यांसह, ओप्पोचा आगामी स्मार्टफोन उच्च मध्यम श्रेणीचा असू शकतो असे सांगण्यात येत आहे. या फोनची किंमत २०,००० रुपयांपेक्षा जास्त असू शकते. सध्या मध्यम श्रेणीमध्ये ओप्पो एफ मालिकेच्या स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. वाचा : वैशिष्ट्ये असतील विशेष आर्सेनल नामक टिपस्टरने चीनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट वेइबो वर ओप्पोच्या आगामी स्मार्टफोनचे डिटेल्स लीक केली आहे. परंतु, हे कोणत्या नावाखाली सादर केले जाईल हे मात्र सांगण्यात आले नाही. लीक झालेल्या अहवालानुसार ओप्पोच्या फोनमध्ये ६.३ इंचचा सॅमसंग ई १ प्रो डिस्प्ले असेल, जो १२० हर्ट्ज डिस्प्ले रीफ्रेश रेटसह असेल. ओप्पोच्या या फोनमध्ये अँड्रॉइड ११ कलर ऑपरेटिंग सिस्टमसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६८ जी एसओसी प्रोसेसर दिसेल. ओप्पोचा आगामी स्मार्टफोन १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज ऑप्शन्ससह ८ जीबी आणि १२ जीबी रॅम पर्यायांमध्ये देण्यात येईल. दमदार बॅटरी आणि कॅमेरा Oppoच्या आगामी स्मार्टफोनमध्ये ४,५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी ५० W फास्ट चार्जिंगला समर्थन देईल. कॅमेर्‍याविषयी बोलायचे तर ओप्पोच्या आगामी स्मार्टफोनमध्येही उत्तम कॅमेरे असतील. मोबाईलमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्याचा प्राथमिक कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा सॅमसंग जीडब्ल्यू ३ सेन्सर असू शकतो. यासह, यात ८ -मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि २-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देखील असेल. इतर वैशिष्ट्यांमध्ये डॉल्बी पॅनोरामिक साऊंड आणि साइड माउंट केलेल्या फिंगरप्रिंट स्कॅनरचा समावेश असू शकतो. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zRLMHC