नवी दिल्ली : ने आपल्या रेंट पेमेंट सेवेचा विस्तार केला आहे. आता ग्राहकांना घर भाडे देण्यासोबतच दुकानाचे भाडे, प्रॉपर्टी डिपॉजिट, टोकन अमाउंट, ब्रोकेज आणि अन्य पेमेंट्स करता येईल. या सेवेमुळे ग्राहकांना फायदा होईल व खर्च एकाच जाग्यावर ट्रॅक करण्यास मदत होईल. सोबतच, कंपनी केल्यावर १० हजार रुपयांपर्यंत देत आहे. वाचाः हे कॅशबॅक ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास मिळेल. या व्यतिरिक्त नवीन आणि जून्या यूजर्सला क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडून देखील रिवॉर्ड मिळेल. कारण, ते क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करत आहे. हे रेंट पेमेंट बेनेफिशियरीच्या बँक अकाउंट अथवा अँड्रेसवर Paytm UPI, किंवा नेट बँकिंगवरून करता येईल. क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास कंपनी १ टक्के फी घेत आहे. वाचाः Paytm वर रेंट पेमेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी यूजर्सला होमस्क्रीनवरील Recharge & Pay Bills या सेक्शनमध्ये जाऊन Rent payment सिलेक्ट करावे लागे. येथे डॅशबोर्डवर सर्व जुने रेंट पेमेंट ट्रॅक करणे आणि सर्व बेनिफिशियरीला एका जागेवर मॅनेज करता येईल. पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले की, ‘घर अथवा दुकानाचे भाडे भारतात जवळपास सर्वांसाठी महत्त्वाचा खर्च आहे. रेंट पेमेंट सेवेद्वारे यूजर्स आपल्या डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि नेट बँकिंगचा वापर करून पेटीएमद्वारे भाडे देऊ शकतात. यामुळे यूजर्ससाठी अन्य गोष्टी देखील सोप्या होतील व सर्व खर्च एकाच जागी पाहण्यास मिळेल. क्रेडिट कार्डद्वारे भाडे दिल्यास १० हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळेल.’ वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pChgwU