नवी दिल्लीः Syska कंपनीने स्वस्त किंमतीची स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टवॉचला नाव दिले आहे. या स्मार्टवॉच मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. Syska Bolt SW200 ही कंपनीची दुसरी स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचमध्ये जबरदस्त डिस्प्ले आणि फीचर सोबत येते. वाचाः Syska Bolt SW200 मध्ये पहिल्यापेक्षा जास्त मोठा डिस्प्ले, स्पोर्ट मोड, जबरदस्त डिझाइन आणि एक टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. सिसका ही लाइटनिंगसाठी खूप प्रसिद्ध ब्रँड आहे. आता कंपनी स्मार्टवॉच सेगमेंट मध्ये मार्केट बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. वाचाः Syska Bolt SW200 ची किंमत Syska Bolt SW200 ची किंमत २ हजार ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. याची विक्री भारतात ११ जून पासून सुरू होणार आहे. या स्मार्टवॉचला ब्लॅक, ब्लू, आणि ग्रीन करल मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. वाचाः Syska Bolt SW200 चे फीचर्स Syska Bolt SW200 सर्क्युलर स्मार्टवॉच डिझाइन सोबत येते. याचा राउंड डायल मेडल अलॉय ने बनवला आहे. यात १.२८ इंचाचा आयपीएस एलसीडी स्क्रीन दिली आहे. यात रिझॉल्यूशन २४० बाय २४० पिक्सल दिले आहे. या स्मार्टवॉच मध्ये १०० हून जास्त वॉच फेसला सपोर्ट करते. याला कंपनीने मोबाइल अॅपवरून अॅक्सेस दिला आहे. Syska Bolt SW200 मध्ये SpO2 असल्याने ब्लड ऑक्सिजन लेवल तपासता येते. वाचाः हेल्थ फीचर शिवाय यात १० स्पोर्ट्स मोड दिले आहेत. ज्याला ट्रॅक करता येऊ शकते. यावर फोनच्या नोटिफिकेशनला पाहिले जाऊ शकते. स्मार्टवॉच मध्ये ब्लूटूथ ५.० सपोर्ट दिले आहे. याला वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शनसाठी आयपी ६८ रेटिंग दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर १० दिवसांची बॅटरी बॅकअप मिळतो. वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pBOUTl