Full Width(True/False)

PF अकाउंट असेल तर त्वरित करा आधारशी लिंक, अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संस्थेने () प्रॉव्हिडेंट फंडबाबत मोठा पाऊल उचलले आहे. पीएफ खात्यासाठी १ जून २०२१ पासून एक नवीन नियम लागू करण्यात आले आहे. नवीन नियमांतर्गत एंप्लॉयरला तुमच्या खात्याला व्हेरिफाय करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. असे करण्यास अयशस्वी झाल्यास एंप्लॉयरकडून खात्यात जमा होणारे योगदान रोखले जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी आधार लिंक करणे गरजेचे आहे. हा नियम काय आहे आधी पाहुयात. वाचाः काय आहे EPFO चा नवीन नियम: EPFO ने सोशल सिक्युरिटी कोड २०२० च्या कलम १४२ अंतर्गत नवीन नियम आणला आहे. EPFO ने एंप्लॉयरला निर्देश दिले आहेत की १ जूननंतर पीएफ खात्याशी आधार लिंक न केल्यास इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न (ईसीआर) भरले जाणार नाही. यामुळे पीएफ खातेधारकाच्या खात्यात एंप्लॉयरकडून दिले जाणारे योगदान देखील रोखले जाऊ शकते. त्यामुळे तुमचे खाते आधारसोबत लिंक असणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया तुम्ही देखील करू शकता. आधारशी लिंक करण्यासाठी काय करावे लागेल याची प्रक्रिया समजून घेऊया. वाचाः पीएफ खात्याला आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया
  1. सर्वात प्रथम तुम्हाला EPFO ची अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in and log in वर जावे लागेल.
  2. यानंतर Online Services मध्ये e-KYC Portal वर क्लिक करावे लागेल. येथे Link UAN Aadhar वर क्लिक करा.
  3. येथे तुम्हाला UAN नंबर आणि UAN अकाउंटमध्ये नोंदणी केलेल्या मोबाइल नंबर टाकावा लागेल.
  4. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. ओटीपी तेथे भरा. तुम्हाला १२ आकडी आधार नंबर देखील द्यावा लागेल. यानंतर फॉर्म सबमिट करा.
  5. यानंतर Proposed to OTP व्हेरिफिकेशन पर्याय निवडा.
  6. आता पुन्हा एकदा ओटीपी येईल. हा ओटीपी मोबाइल नंबर अथवा मेलवर येईल. हा ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार पीएफ खात्याशी लिंक होईल.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vL1Loz