नवी दिल्ली. सोशल मीडिया कंपनी फेसबुकने WhatsApp वर WhatsApp शॉप या नावाने एक उत्तम फीचर जोडण्याची घोषणा केली आहे, ज्याच्या मदतीने युजर्स शॉपिंग करताना चॅटिंग करू शकतील. व्हॉट्सअॅप शॉप फीचरमध्ये वापरकर्त्याकडे असा पर्याय असेल की, व्हॉट्सअॅप बिझिनेसचा वापर करून कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तो त्या कंपनीबरोबर किंवा विक्रेत्याशी संवाद साधू शकेल. बुधवारी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी शॉप्स ऑन वॉट्स अँड मार्केटप्लेस, शॉप्स अॅड्स आणि इंस्टाग्राम व्हिज्युअल सर्च सारख्या तीन मस्त फीचर्सची घोषणा केली, जे लवकरच या Appsवर अपडेट्सद्वारे दाखल होतील. वाचा : जोडली जातील नवीन वैशिष्ट्ये फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग येत्या काळात युजर्सच्या सोयीसाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये सादर करणार आहे. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे फेसबुकच्या मालकीचे अॅप्स आहेत आणि त्याचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. सध्या फेसबुक, फेसबुक मार्केटप्लेस आणि इंस्टाग्राम शॉप्स सारख्या वैशिष्ट्यांचा वापर करीत आहेत. जे विक्रेत्याशी थेट संपर्क साधून विविध प्रकारची सामग्री खरेदी करतात. आता व्हॉट्सअॅप यूजर्सला प्रोफाइलमध्ये शॉप ऑप्शनसुद्धा दिसेल आणि ते चांगले उत्पादने खरेदी करण्यास एनेबल असतील. मार्केटप्लेसचे कोट्यवधी युजर्स फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग म्हणतात की, जगभरात अब्जाहून अधिक लोक मार्केटप्लेस वापरत आहेत आणि येणाऱ्या काळात विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील दरी मिटविण्यासाठी आम्ही अनेक नवीन वैशिष्ट्ये सादर करणार आहोत. आता या प्रयत्नात व्हॉट्सअॅप शॉप, शॉप अॅड्स आणि इंस्टाग्राम व्हिज्युअल सर्च यासारख्या नवीन फीचर्सची भर पडली आहे. येत्या काळात आपल्या फोनवर व्हॉट्सअॅपमध्ये शॉप ऑप्शन दर्शविणे अपडेटद्वारे समाविष्ट केले जाईल आणि ते आपल्या सोयीसाठी असेल. व्हॉट्सअॅप शॉपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही वस्तू सहज खरेदी करू शकाल. आगामी काळात आपल्याला असे अनेक तंत्रज्ञान दिसतील. ज्यात, ऑग्मेंटेड रिअलिटी (एआर) च्या माध्यमातून कोणत्याही वस्तूच्या रियल फिजिकल वर्ल्डची झलक मिळेल. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gSass8