Full Width(True/False)

फ्री मध्ये करा Windows 11 अपडेट, फक्त लॅपटॉपमध्ये असायला हवेत हे फीचर्स, जाणून घ्या

नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टने ची घोषणा केली होती. यात क्लीन युजर इंटरफेस, स्टार्ट मेन्यूचा नवीन लूक, नवीन डिझाइनचे मायक्रोसॉफ्ट स्टोर आणि अँड्रॉयड अॅप्स चालवण्याची सुविधा सारखे फीचर्स दिले आहेत. विंडोज १० च्या ६ वर्षानंतर आलेल्या विंडोज ११ ला या वर्षीच्या अखेर पासून २०२२ पर्यंत फ्री मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते. परंतु, तुम्हाला जास्त वाट पाहायची नसेल तर विंडोज इनसाइडर प्रोग्राम (Windows Insider programme) मध्येय समावेश होऊ शकतो. पुढील आठवड्यापासून विंडोज ११ डाउनलोड करू शकता. वाचाः काय आहे Windows Insider programme? सर्वसामान्यांसाठी नवीन विंडोज जारी करण्याआधी मायक्रोसॉफ्ट लोकांनी याची चाचणी करायला हवी. या पद्धतीने तुम्ही मायक्रोसॉफ्टला फीडबॅक देऊ शकता. कसे काम करतो, काय सुधारणा आवश्यक आहे. यासाठी विंडोज इनसायडर प्रोग्रामची सुरुवात करणयात आली आहे. प्रोग्रामसाठी कोणीही रजिस्टर करून विंडोज ११ प्रिव्ह्यूला डाउनलोड करू शकतो. परंतु, सध्या याचे काही फीचर व्यवस्थित काम करीत नाहीत. त्यामुळे याला तुम्ही तुमच्या ऑफिस मशीनमध्ये टाकू नका. वाचाः विंडोज इनसाइडर प्रोग्रामशी कसे जोडाल विंडोज ११ इनसायडर प्रोग्राम मध्ये समावेश होणे खूपच सोपे आहे. तुम्हाला फक्त Windows Insider website ओपन करून रजिस्टर करावे लागणार आहे. त्यानंतर आपल्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटवरून साइन अप करावे लागणार आहे. त्याच्या अटी शर्थीचे पालन करावे लागणार आहे. तुम्ही थेट विंडोज १० पीसीद्वारे सुद्धा प्रोग्राम मध्ये समावेश करू शकता. यासाठी कंप्यूटर पर Settings ओपन करा, Update and security वर जाण आणि Windows Insider programme वर क्लिक करा. वाचाः कसे कराल Windows 11 डाउनलोड प्रोग्राम अंतर्गत विंडोज ११ प्रिव्ह्यूला पुढील आठवड्यापासून डाउनलोड करू शकता. विंडोज ११ डाउनलोड करण्यासाठी कम्प्यूटर मध्ये काही फीचर्स असणे आवश्यक आहेत. यात 64-बिट प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. याशिवाय, लॅपटॉपमध्ये विंडोज अपडेट करण्याआधी कमीत कमी फीचर्स चेक करण्यासाठी PC health app चा वापर करू शकता. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3haKf79