स्मार्टफोनसाठी भारत हा आशियातील सर्वोत मोठे मार्केट म्हणून समोर येत आहे. भारतात स्वदेशी पासून ते परदेशी कंपन्यांचे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसात स्मार्टफोन बाजार प्रचंड वेगाने वाढले आहे. एकेकाळी दक्षिण कोरियाच्या कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या बाजारात आता चीनी कंपन्यांची मक्तेदारी पाहायला मिळत आहे. मात्र, काही ठराविक कंपन्याच या शर्यतीत टिकून राहिल्या आहेत, तर अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारातून आपला गाशा गुंडाळला आहे. अनेक कंपन्यांना या स्पर्धेच्या बाजारात टिकता आलेले नाही. २०१४-१५ मध्ये भारतीय बाजारात छोटे-मोठे अनेक कंपन्यांचे सर्व किंमतीतील स्मार्टफोन उपलब्ध होते. मात्र, काही काळानंतर या कंपन्यांची पिछेहाट झाली. LG Electronics, Sony, HTC, BlackBerry Mobile, Spice, Panasonic आणि iBall सारख्या अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोन्सची विक्री थांबवली आहे. या कंपन्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
स्मार्टफोनसाठी भारत हा आशियातील सर्वोत मोठे मार्केट म्हणून समोर येत आहे. भारतात स्वदेशी पासून ते परदेशी कंपन्यांचे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसात स्मार्टफोन बाजार प्रचंड वेगाने वाढले आहे. एकेकाळी दक्षिण कोरियाच्या कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या बाजारात आता चीनी कंपन्यांची मक्तेदारी पाहायला मिळत आहे. मात्र, काही ठराविक कंपन्याच या शर्यतीत टिकून राहिल्या आहेत, तर अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारातून आपला गाशा गुंडाळला आहे. अनेक कंपन्यांना या स्पर्धेच्या बाजारात टिकता आलेले नाही. २०१४-१५ मध्ये भारतीय बाजारात छोटे-मोठे अनेक कंपन्यांचे सर्व किंमतीतील स्मार्टफोन उपलब्ध होते. मात्र, काही काळानंतर या कंपन्यांची पिछेहाट झाली. LG Electronics, Sony, HTC, BlackBerry Mobile, Spice, Panasonic आणि iBall सारख्या अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोन्सची विक्री थांबवली आहे. या कंपन्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
LG Electronics
दिग्गज टेक कंपनी LG Electronics ने एप्रिल २०२१ मध्ये स्मार्टफोनचे उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केली आहे. एलजीने अनेक हटके स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केले आहेत. मात्र, असे असले तरी या सेगमेंटमध्ये कंपनी स्वतःचे स्थान टिकून ठेवण्यास अपयशी ठरले. स्मार्टफोनचे उत्पादन बंद केले असले तरीही स्टॉकमध्ये असलेल्या फोनची कंपनी विक्री करणार आहे. तसेच, कंपनीने सांगितले आहे की, त्यांच्या ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट दिले जाणार आहे.
LeEco
LeEco ने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये जोरदार एंट्री केली होती. मात्र, कंपनीला फारसे यश न मिळाल्याने अखेर २०१७ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला.
Sony
टीव्ही, हेडफोन्स, स्पीकर्स अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या सोनी कंपनीला मात्र स्मार्टफोन बाजारात काही खास करता आलेले नाही. मे २०१९ मध्ये विक्रीत घट झाल्यानंतर Sony ने भारतीय बाजारातून माघार घेतले असल्याचे सांगितले होते. भारतासोबतच कंपनीने इतर बाजारात देखील स्मार्टफोनची विक्री बंद केली होती. कंपनीने वर्ष २०१८ मध्ये मध्य आणि दक्षिण अमेरिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि ओशनिया सारख्या मोठ्या बाजारपेठातून माघार घेतली होती.
Meizu
Meizu या चीनी कंपनीने देखील Xiaomi प्रमाणे स्वस्त स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या काही डिव्हाइसला त्वरित लोकप्रियता मिळाली. मात्र, कंपनीला स्वतःच जम बसवता न आल्याने अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
HTC
तायवानची दिग्गज टेक कंपनी असलेल्या एचटीसीच्या स्मार्टफोनला एकेकाळी भारतीय बाजारात मोठी पसंती होती. मात्र, इतर कंपन्यांनी बाजारात शिरकाव केल्यानंतर ही कंपनी मागे पडत गेली. २०१९ मध्ये देखील पुन्हा कंपनीने भारतीय बाजारात परतण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. एचटीसीला भारतीय बाजारात चीनी मोबाइल निर्माता कंपन्यांकडून मोठा फटका बसला. अखेर विक्रीत प्रचंड घट झाल्याने कंपनीने भारतीय बाजारात स्मार्टफोनची विक्रीच करणे थांबवले.
Qiku
२०१४ मध्ये Qiku हा स्मार्टफोन ब्रँड लाँच झाला होता. कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स देण्याचा कंपनीने प्रयत्न देखील केला. कंपनीने अनेक स्मार्टफोन लाँच केले, मात्र यश मिळाले नाही.
BlackBerry Mobile
भारतीय बाजारात फीचर फोनची मागणी वाढत असताना ब्लॅकबेरीने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. भारतासह जगभरात BlackBerry च्या QWERTY स्मार्टफोनची लोकप्रियता प्रचंड होती. मात्र अँड्राइड आणि iOS च्या स्पर्धेत कंपनी स्वतःला टिकवू शकली नाही. उत्पादक पार्टनर TCL सोबत करार समाप्त झाल्यानंतर अखेर BlackBerry ने ऑगस्ट २०२० मध्ये स्मार्टफोन बाजारातू माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीचे BlackBerry 9720, BlackBerry Z10 सारख्या फोनला चांगली मागणी होती.
Videocon
बजेट सेगमेंटमध्ये Videocon ने अनेक मोबाइल फोन्स लाँच केले होते. मात्र, विक्री न झाल्यान अखेर कंपनीने स्मार्टफोन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला.
Spice
Spice ही अगदी टप्प्यातील भारतीय कंपन्यांपैकी एक कंपनी असून, जिने भारतीय बाजारात स्मार्टफोनची विक्री सुरू केली. Spice च्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम, कॅमेरा, मोठी बॅटरी मिळत आहे. भारतीय कंपनी असलेले Spice चे स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत उपलब्ध होते. मात्र, जबरदस्त स्पर्धेमुळे कंपनीला भारतीय बाजारातून माघार घ्यावी लागले. कंपनीने Spice F311, Spice V801, Spice XLife 511 Pro, Spice XLife 480Q, Spice XLife 403E, Spice XLife 406 सह अनेक फोन लाँच केले होते.
YU
Micromax चा सब-ब्रँड असलेल्या YU ने देखील Xiaomi सारख्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी बाजारात एंट्री केली होती. मात्र, स्पर्धेमुळे जास्त काळ टिकू शकली नाही.
Panasonic
घरगुती उपयोगीच्या वस्तू बनवणारी जपानची कंपनी Panasonic ने स्मार्टफोन सेगमेंटमध्ये देखील एंट्री केली होती. मात्र, स्वस्त स्मार्टफोन बाजारात पॅनासॉनिकला फारसे यश मिळाले नाही. अखेर कंपनीने भारतीय बाजारात स्मार्टफोनची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट टीव्ही, एसी, कॅमेरा, वॉटर प्यूरिफायर, मायक्रोव्हेव ओव्हनस असे विविध उपयोगी वस्तूंची Panasonic कडून विक्री केली जाते. मात्र, चीनी कंपन्यांचे जबरदरस्त स्पर्धेमुळे Panasonic ला स्मार्टफोन बाजारातून माघार घ्यावी लागली.
InFocus
InFocus या अमेरिकन स्मार्टफोन ब्रँडने देखील काही हँडसेट भारतात लाँच केल्यानंतर अचानक विक्री बंद केली.
iBall
मुंबईमध्ये हेडक्वार्टर असलेल्या iBall ची सुरुवात २००१ सालापासून झाली. छोट्या प्रोडक्टपासून सुरूवात केल्यानंतर कंपनी स्मार्टफोन सेगमेंटमध्ये देखील उडी घेतली होती. माउस, कीबोर्ड, हेडफोन्स, स्पीकर्ससह कंपनीकडून स्मार्टफोनची विक्री केली जात आहे. ग्रामीण भागाला लक्ष्य करून बजेट स्मार्टफोन विक्रीचा कंपनीकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, Oppo, Xiaomi, Vivo आणि इतर स्मार्टफोन कंपन्यांच्या स्पर्धेत iBall ला टिकून राहणे अवघड झाले. त्यामुळे विक्री कमी झाल्याने अखेर कंपनीने स्मार्टफोन बाजारातून माघार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
Alcatel
Alcatel कंपनीला भारतीय बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यश आले नाही व भारतीय ग्राहकांकडून देखील अधिक पसंती मिळाली नाही.
iVoomi
iVoomi या ब्रँडने देखील बजेट स्मार्टफोन विक्रीचा प्रयत्न केला. मात्र, स्पर्धेसमोर कंपनी टिकू शकली नाही.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x35Bdl