Full Width(True/False)

जगातील सर्वात मोठी बॅटरीचा फोन लाँच, 13200 mAH बॅटरी, 'इतक्या' दिवस चार्जची गरज नाही

नवी दिल्लीः 13: भारतात नुकतेच अनेक स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहे.च त्यात 7000mAH बॅटरी पर्यंत स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. परंतु, कधी आपण 13200mAH च्या बॅटरी बद्दल ऐकले आहे का, नाही. परंतु, आता सर्वात मोठी बॅटरीचा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. याची बॅटरी तब्बल 13200mAH इतकी आहे. म्हणजेच एकदा फोनला चार्ज केल्यानंतर तुम्हाला फोन एक आठवडा चार्ज करण्याची गरज नाही. हा फोन Ulefone ने लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी फोनचा टीझर लाँच केला होता. त्यानंतर फोनची खूपच चर्चा झाली होती. या मॉडलचे नाव आहे. वाचाः Ulefone Power Armor 13 चे फीचर्स हा जगातील पहिला रग्ड फोन आहे. जो पडल्यानंतर फुटणार नाही. Ulefone Power Armor 13 मध्ये ६.८१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080 X 2400 पिक्सल आहे. Ulefone Power Armor 13 हेलियो जी 95 प्रोसेसर वर काम करतो. यात तुम्हाला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी तुम्हाला १ टीबी पर्यंत एसडी कार्ड मिळू शकते. वाचाः या फोनमध्ये मागच्या बाजुला चार रियर कॅमेरे दिला आहे. प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. सेकंडरी ८ मेगापिक्सलचा आहे. दोन कॅमेरे २-२ मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फोनवर 4K फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करू शकता. फोनला युनिक बनवता येते. वाचाः Ulefone Power Armor 13 चे खासियत हा फोन ५जी आणि अँड्रॉयड ११ वर काम करतो. यात इंफ्रारेड सेन्सर, एनएफसी आहे. एनएफसी पेमेंट अॅपला सपोर्ट करतो. फोनमध्ये 13200mAH ची बॅटरी दिली आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सोबत 15W चा वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन भारत आणि अन्य देशात कधी पर्यंत लाँच होणार याची माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आली नाही. या फोनच्या किंमतीची माहिती सुद्धा उघड करण्यात आली नाही. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WhgQkZ