मुंबई : फाईव्ह जी वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देत त्याविरोधात खटला दाखल करत कायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अभिनेत्री जुही चावलासह आणखी दोघांना २० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड एका आठवड्यात भरण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी जुही यांच्या वकिलांनी दंड रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने हा निकाल देत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. यांच्यातर्फे त्यांचे वकील मित मल्होत्रा यांनी दंड रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात झाली. त्यावेळी न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांनी याचिकाकर्त्यांच्या या वागणुकीमुळे आश्चर्यचकीत झाल्याचे नमूद केले. तसेच याचिकाकर्ते त्यांच्या चुकीबद्दल दंडाची रक्कम भरण्यास तयार नाही हे देखील आश्चर्यकारक असल्याचे नमूद केले आहे. न्यायालयाने पुढे सांगितले की एकीकडे याचिकाकर्ते खोटी याचिका दाखल करतात आणि दुसरीकडे ती याचिका मागे घेतात. तसेच याप्रकरणी त्यांना झालेल्या दंडाची रक्कमही जमा करत नाही. ही गोष्ट योग्य नाही. वास्तिवक हे प्रकरण न्यायालयाचे अवमान करणारे आहे, तरी देखील न्यायालयाने मोठ्या मनाने त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा केलेला नाही. तरी याचिकाकर्त्यांनी त्यांना ठोठावण्यात आलेला २० लाख रुपयांचा दंड आठवड्याभरात जमा करावा, असे आदेश न्यायालयाने यावेळी दिले आहेत. काय होते नेमके प्रकरण फाईव्हजी तंत्रज्ञानामुळे मानवावर तसेच पृथ्वीवरील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणण्यापूर्वी ते सर्व मानव तसेच प्राणीजातीसाठी आणि पर्यावरणासाठी सुरक्षीत आहे का याची खातरजमा करावी, अशी मागणी जुही चावला यांच्यासह अन्य काही मंडळींनी केली होती. तशी याचिका त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखलकेली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ४ जून रोजी फाईव्ह जी विरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. त्यावेळी त्यांची ही याचिका न्यायलयाने फेटाळून लावली. तसेच याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी कायद्याचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला. तसेच जुही चावलसह इतर याचिकाकर्त्यांना २० लाखांचा दंड ठोठावला. याप्रकरणावर मत नोंदवताना ही याचिका याचिकाकर्त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी केली होती, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे जुही चावला यांच्यासह इतर याचिकाकर्त्यांना मोठा धक्का बसला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qYlWxx