मुंबई : हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या जाण्यामुळे एका युगाचा अस्त झाला आहे. केवळ हिंदीच नाही तर मराठीमधील अनेक कलाकारांनी दिलीप कुमार यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. मराठीमधील ज्येष्ठ अभिनेते यांनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यासोबत दिलीप कुमार यांच्या काही आठवणींनाही उजाळा दिला आहे. दिलीप कुमार यांना आदरांजली वाहताना अशोक यांनी सांगितले, ' दिलीप कुमार यांच्या निधनामुळे केवळ हिंदीच नाही तर भारतीय सिनेमासृष्टीची मोठी हानी झाली आहे. मला दिलीपजींसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही याची मला खंत आहे. भारतीय सिनेमासृष्टीमध्ये दिलीपजींसारखा अभिनेता होणे नाही... या सम हाच... असे मला वाटते. दिलीप कुमार यांची स्टाईल, त्यांचे व्यक्तीमत्व, त्यांच्या अभिनयातील कौशल्य वादातीत होते. भारतीय सिनेमातील 'ट्रॅजेडी किंग' अशी उपाधी त्यांना मिळाली होती. हे उपाधी मिळवलेले ते एकमेव अभिनेते आहेत...दिलीप कुमार यांच्यासारखा अभिनेता पुन्हा होणे नाही...' दिलीप कुमार यांच्याशी भेटीचा योग आल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. त्याबद्दल ते म्हणाले, 'एकादा दिलीपसाहेबांना 'मराठी संगीत' हे नाटक पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. दिलीप कुमार हे अस्खलित मराठी बोलू शकतात, हे फार कमी ल लोकांना माहिती आहे. हे नाटक संपल्यांतर, मला दिलीपसाहेबांना भेटण्याची संधी मिळाली. काही क्षण त्यांच्यासोबत घालवणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी नाटकातील माझे काम पाहून त्यांनी भरभरून माझे कौतुक केले. ते मला म्हणाले, 'क्या टायमिंग है तुम्हारी...' त्यांच्या तोंडातून हे शब्द मी ऐकले तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी जे ऐकतोय त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तो क्षण मी उभ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही... '


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dSjMKy