Full Width(True/False)

Aadhar Card मध्ये नकळत दिले चुकीचे डिटेल्स? असे करा अपडेट, वापरा ही सोप्पी ट्रिक

नवी दिल्ली. आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त कागदपत्र आहे. सिम कार्डपासून ते घर खरेदी पर्यंत आधार कार्ड अनिवार्य आहे. म्हणूनच आधार कार्ड जवळ असणे खूप महत्वाचे आहे. परंतु, अनेक वेळा आधार कार्ड बनवताना लोक नकळत चुकीचे तपशील देतात. आणि चुकीच्या माहितीमुळे अनेक महत्वाची कामे अडतात. काही टिप्स वपरून आधार कार्डमधील चुकीची माहिती सहज अपडेट करता येते. जाणून घ्या याबद्दलचे डिटेल्स. वाचा: अशी करा आधारावरील माहिती अपडेट आपल्याला आपल्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास प्रथम आपल्याला आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (uidai.gov.in) वर जावे लागेल. या वेबसाइटला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला आपला आधार अपडेट करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्या समोर एक पेज उघडेल. यामध्ये आपल्या आधारमधील अपडेट अ‍ॅड्रेस अंतर्गत दिलेल्या अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन पर्यायावर क्लिक करावे लागेल. मग एक नवीन पेज उघडेल. येथे आपल्याला नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि भाषा ऑनलाईन असे लिहिलेले दिलेले असेल आणि त्या खाली प्रॉसिड टू अपडेट आधार लिहिले जाईल. यावर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर तेथे कॅप्चा भरावा लागेल. मग तुम्हाला सेंट ओटीपी वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला एक ओटीपी मिळेल. आपल्याला तो ओटीपी प्रविष्ट करावा लागेल. यानंतर आपल्याला अपडेट डेमोग्राफिक्स डेटावर क्लिक करावे लागेल. नंतर बदलू इच्छित असलेला डेटा बदलून पुढे जावे लागेल. आपण सुधारू इच्छित असलेल्या चुकांशी संबंधित कागदजत्र अपलोड करा. यामधील आपली सर्व माहिती अगदी बरोबर असावी. एकदा आपला आधार यूआयडीएआय द्वारे व्हेरिफाय झाल्यानंतर तो अपडेट केला जाईल. सामान्यत: या प्रक्रियेला १५ दिवस लागतात. या प्रक्रियेद्वारे आपण भाषा, लिंग, पत्ता, जन्मतारीख, नाव इ. बदलता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AE2Lxx