Full Width(True/False)

१५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा विवोचे ‘हे’ स्मार्टफोन, मिळेल शानदार डिस्प्ले आणि पॉवरफूल बॅटरी

नवी दिल्ली : १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत गेल्या काही दिवसात अनेक फोन लाँच झाले आहे. विवोचे देखील या किंमतीत अनेक शानदार येतात. विवोच्या या स्मार्टफोमध्ये यूजर्सला ६ जीबीपर्यंत रॅम, पॉवरफूल बॅटरी, मोठा डिस्प्ले मिळतो. या व्यतिरिक्त एक जबरदस्त डिझाइन व कॅमेरा देखील मिळेल. वाचाः ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ViVO Y20G स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून १४,९९० रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. यात ६.५१ इंच एचडी डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन मीडियाटेक हेलियो जी८० प्रोसेसरसोबत येतो. किंमत आणि स्पेसिफिकेशन्स या फोनला तुम्ही १३,९९० रुपयात फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यात ६.४७ इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये बॅक पॅनेलवर १३+८+२+२ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ViVO Y20i मध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात ६.५१ इंच एचडी+ डिस्प्ले मिळतो. सोबतच बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. या व्यतिरिक्त ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४६० चिपसेटसोबत येतो. यात ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. Y15 किंमत आणि स्पेसिफिकेशन्स Vivo Y15 ला १०,५६२ रुपयात खरेदी करू शकता. यात ६.३५ इंच डिस्प्ले दिला जात आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०x१५४४ पिक्सल आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी, तसेच यात हेलियो पी२२ ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hkMpCi