नवी दिल्ली : नेटवर्क टेस्ट ट्रायल मुंबईच्या लोअर परळच्या भागात सुरू झाले आहे. फीनिक्स मॉलमध्ये नोकियाच्या ५जी गियरचा वापर करत कंपनीने ५जी नेटवर्कचे ट्रायल केले. ५जी टेस्ट ट्रायल दरम्यान अल्ट्रा-लो लेटेंसीसोबत १.२Gbps स्पीड मिळाला. तर जवळपास ८५०Mbps अपलोड स्पीड मिळण्यात यश आले. वाचाः गुरुग्रामच्या सायबर हब भागात ५जी नेटवर्कच्या ट्रायल करण्यात आले होते. त्यावेळी एअरटेलने १जीबीपीएस स्पीडचा टप्पा ओलांडला होता. रिपोर्टनुसार, असेच ट्रायल लवकरच कोलकातामध्ये सुरू केले जाणार आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात एअरटनेलने एयरटेल एनएसए (नॉन-स्टँड अलोन) नेटवर्क टेक्नोलॉजीच्या माध्यमातून हैदराबादमध्ये १८०० मेगाहर्ट्ज बँडने एका कमर्शियल नेटवर्कवर ५जी सर्व्हिसचे यशस्वी ट्रायल केले. असे करणारी ही पहिली टेलिकॉम कंपनी ठरली. टेलिकॉम विभागाने मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि दिल्ली या सर्कल्समध्ये एअरटेलला स्पेक्ट्रम अलॉट केले आहे. रिपोर्टनुसार, एअरटेलला ३५०० मेगाहर्ट्ज, २८ गीगाहर्ट्ज आणि ७०० मेगाहर्ट्जमध्ये ५जी ट्रायल स्पेक्ट्रम देण्यात आले आहे. . आणि (Vi) ला ७०० MHz, ३.५ GHz आणि २६ GHz बँडमध्ये स्पेक्ट्रम अलॉट करण्यात आले आहे. अर्ज करणाऱ्या टीएसपीमध्ये एअरटेल, रिलायन्स जिओ, व्हीआय आणि एमटीएनएलचा समावेश आहे. वाचाः यावर्षाच्या सुरुवातीला टेलिकॉम विभागाने टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर्सला (टीएसपी) भारतात ५जी टेक्नोलॉजीचा उपयोग आणि वापराच्या टेस्टिंगसाठी परवानगी दिली होती. टीएसपीने ओरिजनल डिव्हाइस मेकर्स आणि टेक्नोलॉजी प्रोव्हाइडर्स एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉटसोबत करार केला आहे. टेस्टिंगसाठीचा कालावधी ६ महिन्यांचा आहे. ज्यात उपकरणांची खरेदी आणि उभारण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी दिला आहे. लवकरच होणार ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव दें भारतीय टेलीकॉम नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव आयोजित करण्याची शक्यता आहे. २०२१ च्या अखेरीस किंवा वर्ष २०२२ च्या सुरुवातीला आवश्यक कामांसाठी ५जी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VAxR9k