Full Width(True/False)

पार्टनरने केले WhatsApp वर Block? 'या' टिप्स वापरून करा स्वतःला अनब्लॉक, पाहा टिप्स

नवी दिल्ली. आपण सगळेच संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. परंतु कधी कधी मित्र, मैत्रिणी किंवा पार्टनर काही कारणांमुळे आपल्याला ब्लॉक करतात. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण विविध मार्ग शोधतो. ब्लॉक झाल्यावर आपण अस्वस्थ होतो आणि ताण येतो आणि त्या व्यक्तीशी चॅट्स कसे सुरु करावे याबद्दल विचार करण्यास सुरवात करतो. जर एखाद्याने आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले असेल तर टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही आपल्याला काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने समोरच्या व्यक्तीने ब्लॉक करूनही तुम्ही मेसेज करून त्या व्यक्तीशी बोलू शकाल. वाचा: सर्वप्रथम समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे याची खात्री करा. यासाठी तुम्हाला समोर एक मेसेज पाठवावा लागेल. मेसेजवर एकच टिक असेल तर समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेला नाही आणि त्यांनी तुम्हाला ब्लॉक केले आहे. ब्लॉक केलेल्या युजर्सशी पुन्हा बोलण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करावे लागेल लागेल व पुन्हा साइन अप करावे लागेल. त्यानंतर तुम्ही पुन्हा मेसेज देखील पाठवू शकाल. अकाउंट डिलीट केल्यामुळे तुमचा संपूर्ण बॅकअप नष्ट होऊ शकतो. अशात आपल्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे याची आपण खात्री करुन घ्यावी. फॉलो करा या स्टेप्स प्रथम आपण व्हॉट्सअॅप ओपन करा आणि सेटिंग्ज ऑप्शनवर जाऊन अकाउंटवर क्लिक करा. येथे तुम्हाला डिलीट माय अकाउंट दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. नंतर तुम्हाला देशाचा कोड आणि तुमचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. ही स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला डिलीट माय अकाउंटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुन्हा व्हॉट्सअॅप ओपन करा आणि पुन्हा अकाउंट तयार करा. त्यानंतर ज्याने आपल्याला पुन्हा ब्लॉक केले आहे त्या व्यक्तीशी आपण बोलू शकाल. अनब्लॉक करण्यासाठी दुसरीही एक पद्धत आहे. यासाठी तुम्हाला मित्राची मदत घ्यावी लागेल. मित्राच्या मदतीने एक गृप तयार करावा लागेल. ज्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्या व्यक्तीला गृपमध्ये जोडावे लागेल. अशा पद्धतीने तुम्ही गृपमध्ये त्या व्यक्तीशी संवाद साधू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i7IpnZ