नवी दिल्ली. Huawei लवकरच आपला नवीन रेबल हुवावे बँड ६ लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशात, या स्मार्ट बँडची किंमत (हुवावे बँड ६ किंमत भारतात) अधिकृत लाँच होण्यापूर्वीच उघडकीस आली आहे. हा बॅंड या वर्षाच्या सुरुवातीला मलेशियात लाँच करण्यात आला होता. या डिव्हाईसच्या मुख्य वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर, एएमओएलईडी डिस्प्लेने सुसज्ज असून त्याची बॅटरी दोन आठवड्यांपर्यंत सपोर्ट करत असल्याचा दावा केला जात आहे. वाचा: हार्ट रेट मॉनिटर, एसपीओ २ (रक्त ऑक्सिजन संतृप्ति) आणि ताणतणाव देखरेखी सारखी वैशिष्ट्ये देखील या बँडमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय महिलांकरिता खास आरोग्यविषयक ट्रॅकिंग वैशिष्ट्ये देखील यात उपलब्ध आहेत, हा बँड ९६ वर्कआउट मोड्ससह येतो. Huawei Band 6 किंमत भारतात फॉरेस्ट ग्रीन, अंबर सनराईज, ग्रेफाइट ब्लॅक आणि साकुरा पिंक या चार रंगांमध्ये Huawei Band 6 लाँच करण्यात येईल. भारतात या अत्याधुनिक स्मार्ट बँडची किंमत ४,४९० रुपये असेल असे ई-कॉमर्स साइट Amazonच्या बॅनरवरून उघडकीस आले आहे. हुवावेतर्फे अलीकडेच असे ट्विट देखील करण्यात आले आहे की, इच्छुक ग्राहक हुवावे बँड प्री बुक करून विनामूल्य भेटवस्तू मिळवू शकतात. मात्र, कंपनीने Amazon आणि त्यांच्या अधिकृत साइटवर प्री-बुकिंगसाठी कोणतीही लिंक अद्याप शेयर केली नाही. Huawei Band 6 वैशिष्ट्ये Huawei Band 6मध्ये १.४७ -इंचचा AMOLED पूर्ण-दृश्य (१९४ x३६८ पिक्सेल) रंग डिस्प्ले असून त्याचे स्क्रीन-टू-बॉडी रेशो ६४ टक्के आहे आणि पिक्सेल डेन्सिटी २८२ पिक्सेल प्रति इंच आहे. या आगामी बँडची स्क्रीन हुवावे बँड ४ पेक्षा १४८ टक्के मोठी आहे. डिव्हाईसची बॅटरी ठराविक वापर केल्यास दोन आठवडे आणि अधिक वापर केल्यास १० दिवसांपर्यंत चालत असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर पाच मिनिटांच्या चार्जिंगवर दोन दिवस बॅटरी लाईफ यात तुम्ही मिळवू शकता. मायक्रोसाईटने असेही उघड केले आहे की, हुआवेई स्मार्ट बॅन्ड ट्रूस्लीप २.० स्लीप मॉनिटरिंग, २x हार्ट रेट मॉनिटरींग, एसपीओ २ रक्त-ऑक्सिजन संतृप्ति देखरेख यासारख्या वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. यात पोहणे, ट्रेडमिल, धावणे इत्यादी वर्कआउट मोड फीचर्स आहे. हुआवेई बँड ६ ५एटीएम (५० मीटर पर्यंत) पाणी प्रतिरोधक आहे. हा बँड Android 6.0 आणि त्यावरील आवृत्तींना सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AHBtpV