नवी दिल्लीः अॅमेझॉन इंडियाने स्मार्टफोन अपग्रेड सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक स्मार्टफोन्सवर चांगली डील मिळत आहे. ई-कॉमर्स कंपनी OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, Vivo आणि Oppo सारख्या स्मार्टफोन ब्रँड्सवर ऑफर दिली जात आहे. यावर बँक ऑफर्स सुद्धा दिली जात आहे. हा सेल ८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. वाचाः एसबीआय बँकेच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सोबत किंवा ईएमआय पेमेंटवर इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. यावर काही स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या टॉप ऑफर संबंधी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. यात आयफोन १२ सारख्या प्रीमियम स्मार्टफोनवर सुद्धा डिस्काउंट दिला जात आहे. आयफोन १२ ला या सेलमध्ये ९ हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत विकले जात आहे. या सेल दरम्यान ७० हजार ९०० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, ग्राहकांना एसबीआय ग्राहकांना क्रेडिट कार्डवरून ७५० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. वाचाः सर्व डिस्काउंट सोबत याला ७० हजार १५० रुपयात खरेदी करू शकता. याच प्रमाणे वनप्लस ९ सीरीजचा बँक ऑफर्स सोबत ४ हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबतच ९ महिन्याचे नो कॉस्ट ईएमआय ऑफर केले जात आहे. या सेलमध्ये रेडमी ९ ला खूप मोठा ऑफ दिला जात आहे. याची खरी किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या फोनला ७ हजार ९२० रुपयात खरेदी केले जाऊ शकते. यात एसबीआय बँकेचे इंस्टेंट डिस्काउंट ऑफरचा समावेश आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला iQOO Z3 5G स्मार्टफोनला १६ हजार ४९० रुपयांत विकले जात आहे. या फोनला १९ हजार ९९० रुपयांत लाँच केले होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AHvBgC