मुंबई : '' कार्यक्रम प्रसारित होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 'बिग बॉस १५' टीव्हीवर प्रसारित होण्याआधी आधी तो ओटीटीवर प्रसारित होणार आहे. 'बिग बॉस ओटीटी' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रपट निर्माता करणार आहे. या कार्यक्रमासाठी काही सेलिब्रिटींची नावे निश्चित झाले आहेत तर अजूनही काही कलाकारांना सहभागासाठी संपर्क साधला जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस ओटीटी'साठी सिद्धार्थ सुक्ला आणि शहनाज गिल यांच्याशिवाय रिद्धिमा पंडित, दिव्या अग्रवाल,राकेश बापट, सना मकबूल यांची नावे निश्चित झाली आहेत. तर आता या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवर याला स्पर्धक म्हणून आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याने होकार दिल्यास तो देखील या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो. सुनील ग्रोवरने 'बिग बॉस ओटीटी' अथवा 'बिग बॉस १५' मध्ये सहभागी व्हावे, यासाठी निर्माते प्रयत्नशील आहेत. अद्याप सुनील ग्रोवरने याबाबत कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, मॉडेल आणि अभिनेत्री नेहा मलिकचे नाव देखील 'बिग बॉस ओटीटी'साठी निश्चित झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये देखील 'बिग बॉस ११' साठी नेहाच्या नावाचा विचार झाला होता. परंतु त्यावेळी ते जमले नाही. परंतु आताच्या पर्वामध्ये नेहा मलिक सहभागी होणार आहे. 'बिग बॉस ओटीटी' हा कार्यक्रम येत्या ८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सुरुवातील सहा आठवडे हा कार्यक्रम वूट अॅपवरून प्रसारित होईल. त्यानंतर तो कार्यक्रम टीव्हीवरून 'बिग बॉस १५' या नावाने प्रसारित केला जाईल. 'बिग बॉस १५' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. तर कार्यक्रमाच्या या पर्वामध्ये कलाकारांसोबत सर्वसामान्य व्यक्ती देखील सहभागी होणार आहेत. यंदाच्या पर्वामध्ये 'जनता फॅक्टर'च्या माध्यमातून सर्वात मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'अनकॉमन पॉवर्स ' सर्वसामान्य प्रेक्षकांना देण्यात आल्या आहेत. या पॉवरच्या माध्यमातून ते आपल्या आवडत्या स्पर्धकांना निवडू शकणार आहेत. तसेच त्यांना या कार्यक्रमात टिकून राहण्यासाठी ही पॉवर वापरता येणार आहे. त्याशिवाय सर्वसामान्यांकडे असलेल्या पॉवरमुळे ते स्पर्धकाला कार्यक्रमात ठेवू शकणार आहेत अथवा त्यांना घरी पाठवता येणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3C1jift