Full Width(True/False)

ग्राहकांना मोठा झटका; आता Jio, Airtel, Vi च्या ‘या’ प्लान्समध्ये मिळणार नाही SMS चा फायदा

नवी दिल्ली : भारतात आता ग्राहकांना स्वस्त प्रीपेड प्लान्समध्ये एसएमएसचा फायदा मिळणार नाही. , आणि या टेलिकॉम कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना १०० रुपयांपेक्षा कमीच्या प्रीपेड प्लान्समध्ये ग्राहकांना एसएमएसचा फायदा मिळणार नाही. याआधी प्लान्समध्ये कॉल, एसएमएस आणि डेटा मिळत असे. मात्र, आता एसएमएस बेनिफिट्स मिळणार नाही. कंपन्यांच्या प्लान्समध्ये हा बदल पाहायला मिळत आहे. वाचा: जिओ आणि एअरटेलकडे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे कमी प्लान्स आहेत. मात्र, वीआयकडे असे अनेक आहे. वीआयच्या ९५ रुपयांच्या प्लानमध्ये २०० एमबी डेटा, ७४ रुपये डेटा मिळतो. याची वैधता ५६ दिवस आहे. मात्र, एसएमएसचा फायदा मिळत नाही. कंपनीचा ४९ रुपयांचा प्लान १०० एमबी डेटा आणि ३८ रुपये टॉकटाइमसह येतो. याची वैधता २८ दिवस आहे. परंतु, यात आतात एसएमएस मिळत नाही. या लिस्टमध्ये ७९ रुपये, ६५ रुपये, ५९ रुपये आणि ३९ रुपयांचे अनेक प्लान्स आहेत. एअरटेलने देखील आपल्या प्रीपेड प्लान्स पोर्टफोलियोला अपडेट केले आहे. यात कंपनीने ४९ रुपयांचा प्रीपेड प्लान बंद करत ७९ रुपयांचा प्लान आणला आहे. यामध्ये ग्राहकांना ६४ रुपये टॉकटाइम आणि २०० रुपये डेटा मिळतो. २८ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये एसएमएसची सुविधा मिळत नाही. जिओच्या ९८ रुपयांच्या प्लानमध्ये १४ दिवसांसाठी १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. मात्र एसएमएस बेनिफिट्स मिळत नाही. टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयामुळे स्वस्त प्रीपेड प्लान्स खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. अनेक सेवांचे व्हेरिफिकेशन एसएमएसद्वारे होते. परंतु, प्लानमध्ये एसएमएस बेनिफिट्स न मिळाल्याने महागडे फायदे खरेदी करावे लागतील. कंपन्या याद्वारे ARPU वाढवण्याकडे लक्ष देत आहेत. दरम्यान, स्वस्त प्लान्समधून एसएमएस हटवण्याचा निर्णय नवीन नाही. रिपोर्टनुसार, जिओने यावर्षी मे महिन्यात असाच निर्णय घेतला होता. त्यानंतर आता एअरटेल आणि वीआयने बदल केले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fi9CDU