मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच नाव गाजतंय. ते म्हणजे, . एका अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमुळे सागरला इतकी लोकप्रियता मिळाली की तो रातोरात स्टार बनला. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याला लाजवेल असा देखणा चेहरा आणि पिळदार शरीरयष्टीमुळे सागर सोशल मीडियावर इतका लोकप्रिय झाला की त्याने चित्रपटात काम करावं, असं अनेकांना वाटून गेलं. त्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होईल असं दिसतंय. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांनी सागरला त्यांच्या आगामी चित्रपटात भूमिका देण्याचं आश्वासन दिलं आहे. सागरचे फोटो सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तुषार भामरेने एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला. त्यावेळेस तुषारने सागरबद्दल अनेक गोष्टीचा उलगडा केला. तुषारच्या म्हणण्यानुसार, सागर त्याला पहिल्यांदा दिसला तेव्हा तुषार त्याच्या पत्नीसोबत चष्मा खरेदी करण्यासाठी गेला होता. सिलेंडरच्या गाडीजवळ विचारमग्न अवस्थेत उभ्या असलेल्या सागरचे तुषारने दोन फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. खरं तर, सागरचा लुक तुषारलाही आवडला होता. सागरचे फोटो पोस्ट करताना तुषारच्या हे ध्यानीमनी देखील नव्हतं की सागर रातोरात स्टार होईल. तुषारने सांगितल्याप्रमाणे, सागरला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर तुषारने सागरशी संपर्क साधला. सर्वप्रथम तुषारने त्याचे फोटो न विचारता सोशल मीडियावर टाकल्याबद्दल सागरची माफी मागितली. उलट सागरने मात्र तुषारचे आभारच मानले. अचानक मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळे सागर भारावून गेला होता. सागरला प्रवीण यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात संधी देण्याचं आश्वासन दिलं आहे, असं तुषारने सांगितलं. यानंतर सागरच्या दिसण्यामुळे तो मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही झळकला तर नवल वाटायला नको.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xayRik