Full Width(True/False)

'मला खोटं कौतुक करायला सांगितलं' सलीम मर्चंटचा खुलासा

मुंबई: मागच्या काही काळापासून सिंगिंग रिअलिटी शो '' सातत्यानं चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्यात हा शो वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. काही काळापूर्वीच किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. पण या शोमधून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांनी या शोवर बरीच टीका केली होती. स्पर्धकांचं जबरदस्तीने कौतुक करायला लावलं जातं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर अभिजित सावंत, सोनू निगम, सुनिधी चौहान यांनीही या शोवर टीका केली होती. त्यांच्यानंतर आता प्रसिद्ध गायक आणि म्यूझिक कम्पोझर सलीम मर्चंटनंही या शोबाबत मोठं विधान केलं आहे. यांनी शोबाबत मोठा खुलासा केला आहे. यासोबतच शो मेकर्सनी त्यालाही स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी सांगितल्याचं म्हटलं आहे. सलीम मर्चंटनं इंडियन आयडल आणि द इंडिया वॉइस सारख्या शोसाठी परीक्षक म्हणून काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलीम म्हणाला, 'हे माझ्यासोबतही झालं आहे. पण मी त्यांचं अजिबात ऐकलं नाही. त्यामुळेच कदाचित मी आज त्या परीक्षकांच्या खुर्चीत दिसत नाहीये. मला सांगितलं गेलं आहे म्हणून मी कोणाचं कौतुक करत नाही. मी कौतुक यासाठी करतो कारण एखाद्याच्या चुका शोधण्यापेक्षा चांगल्या गोष्टी पाहायला मला जास्त आवडतात.' सलीम म्हणाला, 'माझ्यासोबत हे अनेकदा झालं आहे. अनेक शोच्या मेकर्सनी मला सांगितलं आहे की, कृपया तुम्ही कोणत्याही नकारात्मक कमेंट करू नका. पण मी असं करायला नकार दिला. मी याबाबतीत थोडा स्मार्ट आहे. मला जर कोणत्याही स्पर्धकामध्ये काही कमतरता जाणवली तर मी त्यांना सकारात्मक स्वरूपात सांगतो. यामागे माझं एवढंच मत असतं की, त्याला वाईट वाटू नये आणि त्यानं आपल्या चुकांमधून शिकेल.' काही दिवसांपूर्वीच इंडियन आयडल १२ मध्ये किशोर कुमार स्पेशल एपिसोड झाला होता. ज्यात किशोर कुमार यांची १०० गाणी गायली गेली होती. पण हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं गेलं होतं. त्यानंतर किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनीही आपल्याला हा व्हिडीओ अजिबात आवडला नाही आणि स्पर्धक कसेही गायले तरीही तुम्ही त्यांचं कौतुक करायचं असं मेकर्सनी मला सांगितल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सातत्यानं हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3AeUaB7