Full Width(True/False)

मी त्यांना कधी भेटले नाही, पण...राज कौशल यांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट

मुंबई: बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. राज यांच्या अचानक जाण्यामुळं कुटुंबियांसोबतच त्यांच्या मित्र मैत्रिणींना धक्का बसलाआहे. अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत राज यांना आदरांजली वाहिली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिनं देखील एक खास शेअर केली आहे. शर्मिला आणि राज कधीही एकमेकांना प्रत्यक्षात भेटले नाहीत. तरी देखील त्यांच्या निधनामुळं धक्का बसल्याचं शर्मिलानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'मी त्यांना प्रत्यक्षात भेटू शकले नाही. आम्ही सोशल मीडियावर मित्र होतो.दरवर्षी ते माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायचे. त्यांच्या निधनानंतर मला इतकं दु:ख झालं आहे. तर त्यांच्या कुटुंबियाना किती मोठा धक्का बसला असेल, याचा वितारही करू शकत नाही. त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी मला केलेले शेवटचे मेसेज पाहिले. एखादा व्यक्ती निघून गेला,आपण हेच करतो', असं ती म्हणते. ताराबद्दल वाईट वाटतं राज कौशल आणि यांनी गेल्या वर्षीच चिमुकल्या ताराला दत्तक घेतलं होतं. नुकतंच तिला तिचं कुटुंब मिळालं होतं. आणि आता तिनं तिच्या वडिलांना गमावलं...याचंच प्रचंड वाईट वाटतं, असंही शर्मिलानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UebRR0