मुंबई : कार्यक्रमातील स्पर्धक आणि परीक्षक यांची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. यातील चिमुरडे स्पर्धक आणि परीक्षक यांची सोशल मीडियावर चर्चा आहे. या कार्यक्रमातील परीक्षक आर्या आंबेकरची चर्चा अधिक आहे. आर्याच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. आर्याही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. तिच्या गाण्यांचे व्हिडीओ तसेच तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या आठवड्यात सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये स्पर्धकांनी पारपंरिक गाणी सादर केली होती. यावेळी स्पर्धकांसोबत परीक्षकांनीही पारंपरिक ड्रेस घातले होते. यामध्ये सर्वात भाव खाऊन गेली ती . आर्याने पारंपरिक आणि आधुनिक अशा फ्युजन ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यानंतर तिच्या या फोटोंना भरभरून लाइक आणि कमेन्ट मिळत आहेत. आर्याने या भागामध्ये पारंपरिक साजही केला होता. आर्याने नथ घातल्याने तिचा हा साजशृंगार अधिकच देखणा झाला होता. आर्याच्या या ड्रेसचं डिझाइन श्रद्धा भोसलेने केले होते. ड्रेसला पारंपारिकतेसोबतच आधुनिकतेचा टच दिल्याने तो खूपच सुंदर दिसत होता. याशिवाय आर्यानेही हा ड्रेस खूप छान पद्धतीने कॅरी केल्याने त्या ड्रेसचं सौंदर्य अधिक उठून दिसत होतं. या ड्रेसमधील आर्याच्या या देखण्या फोटोंची तुफान चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अनेकांना तिच्या आवाजाबरोबरच तिचे दिसणेही आवडू लागले आहेत. तर काहींनी आर्याला ही त्यांची क्रश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आर्या जेव्हा स्पर्धक म्हणून या कार्यक्रमात सहभागी झालेली होती तेव्हा देखील तिच्या आवाजाची भुरळ सगळ्यांना पडली होती. आता तिच्या आवाजासोबतच तिच्या सौंदर्याची भुरळही पडली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xm9l9N