मुंबई- काही काळापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या मुंबई स्थित ऑफिसवर मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. त्यात कंगनाच्या ऑफिसचा काही भाग पाडण्यात आला होता. आता बॉलिवूड अभिनेते यांच्या बंगल्यावर देखील मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. अमिताभ यांच्या '' बंगल्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बिग बींच्या बंगल्याची भिंत पाडण्यात येणार आहे. यासंदर्भात २०१७ साली बिग बींना नोटीसही बजावण्यात आली आहे. जुहू येथे अमिताभ यांच्या मालकीचे तीन बंगले आहेत. त्यातील 'प्रतीक्षा' बंगल्याच्या भिंतीवर ही कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी महानगर पालिकेने 'प्रतीक्षा' बंगल्याच्या बाजूला असलेल्या जागेवरील भिंत पाडून रस्त्याचं बांधकाम केलं होतं. त्यावेळेस अमिताभ यांनाही महानगर पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, अमिताभ यांच्याकडून कोणतंही उत्तर न गेल्याने आता ही कारवाई करण्यात येत आहे. नोटीस बजावूनही कारवाई न झाल्याने महानगर पालिकेच्या उद्देश्यांवर प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु, आता मात्र ही कारवाई पूर्ण करण्यात येत आहे. कारवाईचा भाग म्हणून बंगल्याच्या भिंतीवर खुणादेखील करण्यात आल्या आहेत. 'प्रतीक्षा' बंगला हा मुख्य रस्त्याला लागून असल्याने बंगल्याच्या समोर रस्त्याची रुंदी कमी होते. त्यामुळे तिथे ट्रॅफिक जॅमची स्थिती निर्माण होते. रस्त्याला लागून दोन शाळा, एक इस्पितळ आणि मंदिर असल्याने येथे कायम गाड्यांची वर्दळ असते. अमिताभ आपल्या कुटुंबासह सध्या 'जलसा' या बंगल्यावर राहत असले तरी यापूर्वी ते आई- वडिलांसोबत 'प्रतीक्षा' बंगल्यामध्ये वास्तव्यास होते. अमिताभ यांनी मुंबईत खरेदी केलेला 'प्रतीक्षा' हा पहिला बंगला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dEQ9MG