Full Width(True/False)

'दोघांनाही खूप समजावलं पण...' आमिर- किरणच्या घटस्फोटावर मित्रानं दिली प्रतिक्रिया

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि त्याची पत्नी यांनी शनिवारी घटस्फोट घेत वेगळे झाल्याची माहिती दिली. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावरही या दोघांच्या नावाची चर्चा होत असतानाच या दोघांचा मित्र अभिनेता यांनी आमिर- किरणच्या घटस्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमिर आणि किरण यांनी एक अधिकृत निवेदनातून आपल्या घटस्फोटाची माहिती दिली होती. आमिर आणि किरणसोबत काम केलेले अभिनेता अमीन हाजी हे २००५ साली आमिर खान आणि किरण राव यांच्या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. किरण राव आणि आमिर खान यांच्या घटस्फोटावर भाष्य करताना अमीन हाजी म्हणाले, 'जेव्हा आमिर खान आणि किरण राव यांनी मला आणि माझ्या पत्नीला त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं. तेव्हा आम्ही त्यांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्यांच्याकडून त्यांचा निर्णय झालेला होता. ज्यात बदल होणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्हाला त्यांचा हा निर्णय मान्य करावा लागला.' अमीन हाजी पुढे म्हणाले, 'किरण आणि आमिर आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सध्या ते कारगिलमध्ये एकत्र काम करत आहे. त्यांचा मुलगा आझाद देखील त्यांच्यासोबत आहे. त्या दोघांनी आम्हाला खात्री दिली आहे की, अधिकृत आणि कायदेशीर गोष्टींमध्ये बदल झाला असला तरीही ते दोघं एकमेकांना भेटत राहणार आहेत. त्या दोघांमध्ये काहीच बदलेलं नाही. त्यांनी हा निर्णय जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्यांचं सांत्वन करायला हवं होतं पण त्याउलट ते दोघं माझं सांत्वन करत होते. ते दोघंही त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करत आहेत याचा मला आनंद आहे. सकाळीच मला किरणचा मेसेज आला होता तिनं मला आमिर खान आणि आझादसोबतचा तिचा फोटो शेअर केला होता. हे दोघं सध्या कारगिल येथे 'लाल सिंह चढ्ढा'चं शूटिंग करत आहेत.' दरम्यान आमिर आणि किरण यांनी शनिवारी अधिकृत निवेदन सादर केलं. ज्यात त्यांनी लिहिलंय, 'आम्ही १५ वर्ष एकत्र काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आपण आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करू. हा अध्याय पती- पत्नीसारखा नसेल, पण सह-पालक आणि कुटुंब म्हणून आपण एकत्र असू. आम्ही काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याचा विचार केला होता. आता अधिकृतरित्या वेगळे होत आहोत. आम्ही मुलगा आझादचे सह-पालक असू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ. आम्ही सिनेमांसाठी आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी एकत्र काम करत राहू.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Atjunh