भारतात गेल्या काही महिन्यांमध्ये वायर्ड इयरफोनच्या ऐवजी वायरलेस इयरफोन आणि इयरबड्सची मागणी वाढली आहे. अनेक कंपन्या ग्राहकांची मागणी लक्षात घेता एकापेक्षा एक शानदार ट्रू वायरलेस इयरबड्स लाँच करत आहेत. विशेष म्हणजे या वायरलेस इयरबड्सची किंमत देखील खूपच कमी आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. अशा स्थिती जर तुम्ही वॉटर रेसिस्टेंट इयरबड्स शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच स्वस्तात मस्त इयरबड्सबद्दल माहिती देत आहोत. हे इयरबड्स पाण्यापासून तर सुरक्षित राहतातच, विशेष म्हणजे म्हणजे यांची किंमत १५०० रुपयांपेक्षा कमी आहे. या किंमतीत तुम्हाला Micromax, Boult, Ptron, Ambrane, Truke, WeCool सारख्या कंपन्यांचे इयरबड्स मिळतील. या इयरबड्समध्ये बॅटरी लाइफ देखील दमदार मिळते. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून तुम्ही अगदी स्वस्तात या ट्रू वायरलेस इयरबड्सला खरेदी करू शकता.

Micromax Airfunk 1
Micromax Airfunk 1 हे कंपनीचे पहिले ट्रू वायरलेस इयरबड्स असून याची किंमत १२९९ रुपये आहे. हे इयरबड्स वॉटर-रेसिस्टेंट असून, आयपी४४ सह येतात. यामध्ये ९एमएम डायनॅमिक ड्राइव्हर्स आणि स्मार्ट टच कंट्रोल्स देण्यात आले आहे. इयरबड्सला सिंगल चार्जमध्ये ५ तास वापरू शकता.
Boult Audio Freepods Pro
Boult Audio Freepods Pro इयरबड्सची किंमत १२९९ रुपये असून, हे पाणी, धुळ आणि घामापासून सुरक्षित राहतात. यामध्ये बाससाठी मायक्रो सबवुफर देण्यात आले आहे. तसेच, कॉलिंगसाठी ड्यूल मायक्रोफोन्स मिळतात. याची बॅटरी ८ तास टिकते.
Ptron BassBuds Ultima
काही दिवसांपूर्वीच लाँच झालेले Ptron BassBuds Ultima आयपीएक्स४ रेटिंगसह येतात. यामध्ये अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळते. तसेच, टच कंट्रोल्ससह १०एमएम डायनॅमिक ड्राइव्हर देण्यात आले आहे. सिंगल चार्जमध्ये १५ तास म्यूझिक प्लेबॅक मिळेल. याची किंमत १,४९९ रुपये आहे.
Boult Audio AirBass Q10
Boult Audio AirBass Q10 आयपीएक्स५ रेटिंगसह येतात. म्हणजे हे पाण्यापासून सुरक्षित राहतात. यामध्ये लो लेटेंसी गेमिंग मोड आणि पॅसिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळेल. हे सिंगल चार्जमध्ये ६ तास टिकतात. याची किंमत १,०९९ रुपये आहे.
Ptron Bassbuds Plus
Ptron Bassbuds Plus हे वॉटर-रेसिस्टेंटसह येणारे या लिस्टमधील सर्वात स्वस्त इयरबड्स पैकी एक आहेत. याची किंमत फक्त ८९९ रुपये आहे. यामध्ये आजुबाजूचा आवाज कमी करण्यासाठी पॅसिव्ह नॉइस कॅन्सेलिशन फीचर मिळते. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ४ तास टिकते. याशिवाय चार्जिंग केसमध्ये डिजिटल डिस्प्ले देण्यात आला असून, यामध्ये बॅटरीबाबतची माहिती मिळते.
Ambrane NeoBuds 33
या इयरबड्सची किंमत फक्त ७९९ रुपये आहे. हे आयपीएक्स४ रेटिंगसोबत येतात. म्हणजेच, पाण्यापासून सुरक्षित राहतात . यामध्ये टच कंट्रोल आणि १०एमएम ड्राइव्हर यूनिट मिळतात. सिंगल चार्जिंगमध्ये यावर तुम्ही ३.५ तास गाणी ऐकू शकता.
Boult Audio AirBass MuseBuds
Boult Audio AirBass MuseBuds हे इयर हूक आणि वॉटर-रेसिस्टेटं डिझाइनसह येतात. माध्ये नॉइस कॅन्सिलेशन फीचर देण्यात आले आहे. याशिवाय यात मोनोपॉड फीचर देण्यात आले असून, यामुळे इयरबड्सचा वेगवेगळा वापर देखील करू शकता. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ५.५ तास चालते. याची किंमत १,१९९ रुपये आहे.
Truke Buds Q1
Truke Buds Q1 ची किंमत १,२९९ रुपये असून, हे इयरबड्स वॉटर रेसिस्टेंट आहेत. यामध्ये लो लेटेंसी गेमिंग मोड आणि नॉइस कॅन्सिलेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. इयरबड्स अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइस सपोर्ट करतो. यामध्ये १० तास म्यूझिक प्लेबॅक मिळेल.
Ptron Bassbuds Pro
Ptron चे इयरबड्स पाणी आणि घामापासून सुरक्षित राहतात. याची किंमत १,१९९ रुपये आहे. यामध्ये कॉलिंगसाठी प्रत्येक इयरबडसाठी बिल्ट-इन सेरेमिक माइक देण्यात आला आहे. यात नॉइस कॅन्सिलेशन आणि ८एमएम ड्राइव्हर यूनिट मिळतात. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ४ तास टिकेल.
WeCool Moonwalk Mini
WeCool Moonwalk Mini इयरबड्सची किंमत ७९९ रुपये आहे. याला आयपीएक्स५ रेटिंग मिळाले आहे, म्हणजे पाण्यापासून सुरक्षित राहतात. यात ऑटोमॅटिक पेअरिंग फंक्शन आणि इंटेलिजेंट नॉइस कॅन्सिलेशन मिळेल. तसेच, १० मीटरपर्यंत ब्लूटूथ रेंज मिळते. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ४ तास टिकेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fhz0tf