Full Width(True/False)

करिनाच्या दुसऱ्या मुलाच्या 'जेह' नावाचा अर्थ माहितीए का?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री वर्षाच्या सुरुवातीलाच दुसऱ्यांदा आई झाली. २१ फेब्रुवारीला करिनानं दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. पण करिनानं अद्याप आपल्या दुसऱ्या मुलाची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. पण सध्या सोशल मीडियावर करिना आणि सैफनं आपल्या मुलाचं नाव '' असं ठेवल्याची चर्चा सुरू आहे. करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रणधीर कपूर यांनी आपल्या नातवाचं नाव 'जेह' असं असल्याचं सांगितलं. पण याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? करिनानं जेव्हा दुसऱ्या मुलाला जन्म दिला तेव्हा त्याची पहिली झलक पाहण्यासोबतच करिना आणि सैफ त्याचं नाव काय ठेवणार याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना करिना कपूरचे वडील रणधीर कपूर यांनी करिना- सैफनं आपल्या मुलाचं नाव 'जेह' असं ठेवल्याचं सांगितलं आणि चाहत्यांनी इंटरनेटवर या नावाचा अर्थ शोधायला सुरूवात केली. 'जेह' या शब्दाचा लॅटिन अर्थ 'ब्लू क्रेस्टेड बर्ड' असा होतो. हा असा पक्षी आहे जो बोलू शकतो आणि आपल्या पंखांवरील विविध रंगांसाठी हा पक्षी ओळखला जातो. करिना कपूर आणि यांचा मुलगा तैमूरच्या जन्मानंतर त्याच्या नावावरून बराच वाद झाला होता. त्याचं तैमूर असं नाव ठेवल्यानंतर करिना- सैफला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलही केलं गेलं होतं. त्यानंतर सैफनं यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ज्यात त्यानं क्रूर टर्की शासकाचं नाव तिमूर आणि त्यांच्या मुलाचं नाव तैमूर असं असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान सोशल मीडियावर करिनाचा मोठा मुलगा तैमूरची एक वेगळीच क्रेझ आहे. त्याचा बराच मोठा चाहता वर्गही आहे. पण दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या आधीच सैफ- करिनानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. तो म्हणजे ते आपल्या बाळाला सोशल मीडिया आणि फोटोग्राफर्सपासून दूर ठेवणार आहेत. त्यामुळे करिनानं अद्याप त्यांच्या मुलाचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hUOLa3