मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत सोहम ही भूमिका साकारत आहे. याही आधी अद्वैतने अनेक मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आपल्या कामासंदर्भातील तसेच व्यक्तिगत आयुष्यातील काही घटनांचे अपडेट अद्वैत त्याच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना देत असायचा. परंतु अद्वैतने इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया अकाउंटवरून अल्पविराम घेण्याचा निर्णय घेतला आहे. अद्वैतने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. काय लिहिले अद्वैतने अद्वैतने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट लिहिली. यात त्याने म्हटले की, 'सोशल मीडियाचा कंटाळा आला आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम डिअॅक्टिव्ह करत आहे. कदाचित थोड्या वेळासाठी.. माहीत नाही परत कधी येईन.. मी ओके आहे त्यामुळे काय झालं वगैरे विचारायला फोन करू नये.' अद्वैतने सोशल मीडियावर ब्रेक घेण्याचा निर्णय असा तडकाफडकी का घेतला आहे, हे मात्र त्याने सांगितलेले नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अर्थात अद्वैतने घेतलेल्या या निर्णयाचा चाहत्यांनी आदर करत त्याला पाठिंबा दिला आहे. याआधी अद्वैतने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत सौमित्रची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर तो आता 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत सोहमची भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत गिरीश ओक, निवेदिता सराफ आणि उमा हृषिकेश हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hxonny