Full Width(True/False)

सुफी गायकाचं निधन, ढग फुटीनंतर झालेले बेपत्ता; खड्ड्यात सापडले शव

धरमशाला- ढगफुटीनंतर बेपत्ता झालेले सूफी गायक यांचा मृतदेह अखेर सापडला. मनमीत यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबीय आणि चाहते यांना मोठा धक्का बसला आहे. मनमीत यांच्या मृत्यूमुळे '' (Sain Brothers) ची जोडीही फुटली. मनमीत पंजाबच्या अमृतसरमधील होते. 'दुनियादारी' या गाण्याने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. मंगळवारी संध्याकाळी उशिरा कांग्रा येथील करेरी तलावाजवळील एका खड्ड्यात मनमीत यांचा मृतदेह सापडला. शनिवारी मित्रांसह धरमशाला गाठलं सोमवारी धरमशालामध्ये ढगफुटी झाल्यानंतर मनमीत बेपत्ता झालेले. पोलीस आणि बचाव पथकाचे जवान सातत्याने त्यांचा शोध घेत होते. मनमीतच्या मृत्यूची बातमी समजताच अमृतसरमधील त्यांचे मूळ गाव छेहर्ता येथे दु:खाचे वातावरण पसरले आहे. असे म्हटले जाते की, मनमीत सिंग भाऊ कर्णपाल आणि काही मित्रांसह शनिवारी धरमशालेत पोहोचला होता. सोमवारी सकाळी पाण्याच्या तीव्र प्रवाहात मनमीत वाहून गेले रविवारी सर्वजण धरमशाला येथून कारेरी तलावाकडे गेले. रात्री पाऊस सुरू झाला तेव्हा सर्वजण तिथेच थांबले. अशा परिस्थितीत सोमवारी सकाळी तो परत येऊ लागला तेव्हा खड्डा ओलांडताना मनमीत पाण्यात वाहून गेला. त्याला तातडीने शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. ग्रामस्थांच्या मदतीने बचाव पथकाला मृतदेह सापडला कारेरी गावात मोबाईल सिग्नल नसल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने मनमीत सिंगचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. तेथे स्थानिक प्रशासनाशीही संपर्क साधला गेला. वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी सांगितले की मनमीत सिंग कारेरी तलावाजवळ बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. यानंतर बचाव दलाने त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी बचाव पथकाला मनमीत सिंग यांचा मृतदेह खड्ड्यातून सापडला. बचाव दलाने त्यांचा मृतदेह धरमशालेत आणला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eiXG4h