मुंबई : बॉलिवूडचे महानायक सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते सतत सोशल मीडियावर काही ना काही तरी नवीन सकारात्मक पोस्ट शेअर करत असतात . त्यासोबत ते आपल्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टीही शेअर करत असतात. मात्र अलिकडेच अमिताभ यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. पण त्यावरून त्यांना खूप ट्रोल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी दोन ज्येष्ठ कवींच्या नावाने चुकीचे शेर शेअर केल्याने युझर्सने त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांनी सोमवारी रात्री उशीरा त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. त्या फोटोंमध्ये आणि इकबाल यांचे दोन शेर आहेत असे सांगण्यात आले होते. परंतु या दोघांच्याही नावाने जे शेर पोस्ट करण्यात आले ते चुकीचे आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील या गोष्टीची शहानिशा न करता हे फोटो त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिले होते, 'शायरी बनाम शायरी' आता हे चुकीचे फोटो अमिताभ बच्चन यांनी शेअर केल्याने युझर्स त्यांना ट्रोल करत आहेत. अनेकांनी तर त्यांना टीम बदलण्याचा सल्ला दिला. तर काहींनी पोस्ट करण्याआधी गोष्टींची शहानिशा करा असेही सांगितले आहे. ही पोस्ट केल्यानंतर त्यावर येणाऱ्या प्रत्येक कमेन्टमधून अमिताभ यांना ट्रोल केले जात आहे. एका युझरने लिहिले की, 'प्रभू, आता तुमची सोशल मीडियाची टीम बदलून टाका. पोस्ट करण्यापूर्वी त्याची शहानिशा करा आणि मगच पोस्ट करा.' तर अन्य एका युझरने लिहिले की, 'आज गालिब जीवंत असते तर ही पोस्ट पाहून त्यांनी आत्महत्या केली असती. दरम्यान, तुम्हाला संसदेमध्ये असायला हवे. कारण गालिब यांच्या नावाने जे काही होते ते तिथे शोभते.' अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत सांगायचे तर कौन बनगे करोडपतीचे १३ वे पर्व लवकरच सुरू होणार आहे. याच्या चित्रीकरणामध्ये ते सध्या व्यग्र आहेत. त्याशिवाय झुंड, चेहरे, ब्रह्मास्त्र, यांसारखे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ed93KL