कोलकत्ता- अलीकडेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती ला पॉर्न आणि अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणानंतर पॉर्न फिल्म बनवणाऱ्या अनेक लोकांची आणि अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. आता कोलकाता पोलिसांनी ३० वर्षीय अभिनेत्री ला अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. ई-टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नंदिता दत्तासह तिचा सहकारी मैनाक घोष यालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांवर नवीन मुलींना वेब सीरिजमध्ये कामाचे आमिष दाखवून आणि धमकी देऊन बळजबरीने शूट करून घेण्याचे आदेश आहेत. नंदिताने स्वतः देखील अश्लील सिनेमांमध्ये काम केले आहे, ज्यात तिच्या पात्राचे नाव नॅन्सी भाभी होते. २६ जुलै रोजी दोन मॉडेलनी नंदिता आणि मैनाक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर दोघांनाही पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. तक्रार करणाऱ्या मॉडेलने आरोप केला आहे की तिचा न्यूड व्हिडिओ जबरदस्तीने बल्लीगंजच्या एका स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला. शहरातील न्यू टाऊन हॉटेलमध्ये तिच्या मैत्रिणीकडून एका अडल्ट व्हिडिओमध्ये जबरदस्तीने काम करून घेतल्याचा आरोपही पीडितेने यावेळी केला. ई-टाइम्सशी बोलताना, एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, 'आम्ही नंदिता आणि मैनाक यांना त्यांच्या इतर सहकाऱ्यांबद्दल विचारू आणि हे लोक कुठल्या ठिकाणी पोर्नचं शूट करायचे याचाही तपास करू. तसेच हे व्हिडिओ कुठे विकले गेले आणि ही टोळी कोणत्या मोठ्या पॉर्न रॅकेटचा भाग आहेत का हे देखील तपासले जाईल.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VksP0C