नवी दिल्ली: दमदार पावर बँक खरेदी करायचा असल्यास शाओमीचे हे नवे डिव्हाईस तुमच्याकरिता एक चांगला पर्याय आहे . शाओमीच्या नवीन Mi HyperSonic ला ५० W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि तीन-पोर्ट डिझाइन देण्यात आले आहे. याची क्षमता २०,०००mAh आहे. हे पॉवर बँक ४५ W पर्यंत लॅपटॉप चार्ज करू शकते. मी इंडिया स्टोअर वेबसाइटवर क्राउडफंडिंग मोहिमेअंतर्गत ची किंमत ३,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हे डिव्हाईस एकाच मॅट ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आले असून त्याची डिलिव्हरी १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक ग्राहक मोहिमेला समर्थन देऊ शकतात आणि ३,४९९ रुपयांच्या सूटनंतर पॉवर बँक खरेदी करू शकतात. क्राउडफंडिंग मोहीम संपल्यानंतर त्याची किंमत ४,९९९ रुपये करण्यात येईल. वाचा: Mi HyperSonic Power Bank ची वैशिष्ट्ये Mi HyperSonic Power Bank मध्ये २०,००० mAh क्षमतेची लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. जी जास्तीत जास्त ५० W पर्यंत चार्जिंग स्पीड देऊ शकते. येथे दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. फक्त टाइप-सी पोर्ट ५० W चार्जिंग स्पीडसाठी सक्षम आहे. त्याच वेळी, टाइप-ए पोर्ट्स ड्युअल कनेक्शन मोडमध्ये १५ W आउटपुट करतील. तसेच २२.५ W पर्यंत जलद चार्जिंग वितरीत करतील. यूएसबी टाइप-सी पोर्ट पॉवर डिलीव्हर (पीडी) ३.० ला देखील समर्थन देते. Mi HyperSonic Power Bank लो पॉवर चार्जिंग मोडला देखील सपोर्ट करते, जे पॉवर बटण डबल टॅप करून सक्रिय केले जाऊ शकते. याच्या मदतीने , ब्लूटूथ हेडसेट, फिटनेस बँड आणि स्मार्टवॉच सारख्या कमी पॉवर आउटपुट डिव्हाइसेस सुरक्षितपणे चार्ज केले जाऊ शकतात. Mi HyperSonic ला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे ३ तास आणि ५० मिनिटे लागतात. यात ४५ W चार्जिंग सपोर्ट आहे. शाओमीचे म्हणणे आहे की, ते २ तास २७ मिनिटात लेनोवो L४८० लॅपटॉप चार्ज करू शकते. त्याचबरोबर ते Mi 11X Pro ला १ तास ५ मिनिटात चार्ज करू शकते. या पॉवर बँकेमध्ये १६ लेयर चिप संरक्षण अंगभूत आहे आणि भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) प्रमाणित आहे. यामध्ये शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन सारखे अनेक प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BZmKY2