Full Width(True/False)

अगदीच सुकून गेली की गं... असं म्हणत अभिज्ञा भावेची या अभिनेत्यानं केली मस्करी

मुंबई : ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. विविध मालिकांमधून अभिज्ञाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिज्ञाचा फॅशन सेन्सही खूपच छान असल्याने विविध अंदाजातील स्वतःचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली अभिज्ञा तिच्या वेगवगळ्या लूकमधील अनेक फोटो सातत्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलिकडेच अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साडीतील फोटो शेअर केले आहेत. अभिज्ञा साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे सुंदर फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच तिच्या सौंदर्याची तारीफ करणा-या कॉमेन्टही केल्या आहेत. अभिज्ञाच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील तिच्या या फोटोंवर कॉमेन्ट केल्या आहेत. साडीमधील हे सुंदर फोटो पोस्ट करताना अभिज्ञाने ' ए सुकून छीनने वालो, मन ही मन अपने लिये सुकून क्यो मांगते हो?' ही शायरी पोस्ट केली आहे. अभिज्ञाने पोस्ट केलेले फोटो आणि त्याला अनुरूप अशी शायरी वाचून तिच्या चाहत्यांनी भरभरून कॉमेन्ट केल्या आहेत. तर काही कलाकारांनीही कॉमेन्ट केल्या आहेत. त्यामध्ये अभिनेता सौरभ गौखले याने केलेली कॉमेन्ट तर सर्वात भन्नाट आहे. त्याने लिहिले आहे, 'सुकून गेलीयेस अगदी...' सौरभने अभिज्ञानाची मस्करी केलेली मस्करी पाहून श्रेया बुगडेसह काही जणांनी हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. सौरभची ही कॉमेन्ट पाहिल्यावर अभिज्ञाने देखील लगेचच कॉमेन्ट केली आहे. तिने लिहिले आहे'अरे हलकट माणसा...' दरम्यान, अभिनेता सौरभ आणि अभिज्ञा हे एकमेकांचा छान मित्र-मैत्रिणी आहेत. याच मैत्रीच्या हक्काने सौरभने अभिज्ञाची चांगलीच फिरकी घेतली आहे. या दोघांच्या मैत्रीमधील हे प्रेमळ भांडण पाहून चाहत्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jU0usf