Full Width(True/False)

३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यासह आज लाँच होणार ओप्पोचा ‘हा’ शानदार फोन, पाहा किंमत

नवी दिल्ली : निर्माता भारतात आपल्या स्मार्टफोन लाइनअपचा विस्तार करणार आहे. कंपनी आज आणि स्मार्टफोनला आज लाँच करेल. दोन्ही स्मार्टफोन्ससोबतच ट्रू वायरलेस इयरबड्सला देखील नवीन कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे. ओप्पोने या नवीन इयरबड्सला नाव दिले आहे. आज दुपारी ३ वाजता होणाऱ्या इव्हेंटमध्ये कंपनी या प्रोडक्ट्सला लाँच होणार असून, इव्हेंटचे कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर लाइव्हस्ट्रीम केले जाईल. हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहेत. भारतात देखील तेच व्हेरिएंट लाँच केले जाण्याची शक्यता असून, लाँचिंगच्या आधी याची किंमत समोर आली आहे. वाचाः Oppo Reno 6 आणि Reno 6 Pro ची किंमत रिपोर्टनुसार, प्रो ची किंमत जवळपास ४० हजार रुपये आणि रेनो ६ ची किंमत ३२ हजार रुपये असू शकते. कालच Satzomake Unbox नावाच्या यूट्यूब चॅनेलवर कथित अनबॉक्सिंग व्हिडीओ लाइव्ह झाला असून, यात Oppo Reno 6 Pro च्या किंमतीची माहिती मिळाली. यानुसार, भारतात ओप्पो रेनो ६ प्रोच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ४६,९९० रुपये असेल. रेनो ६ सीरिजसाठी फ्लिपकार्टवर एक टीझर पेज देखील तयार करण्यात आले आहे. यावरून या दोन्ही फोन्सची फ्लिपकार्टवरून विक्री होईल हे स्पष्ट होते. Oppo Reno 6 Pro स्पेसिफिकेशन्स ओप्पो रेनो ६ प्रो मध्ये एक ऑक्टो-कोर मीडियाटेक डायमेंशन १२०० प्रोसेसर आहे, जो १२ जीबी रॅमसोबत येईल. यात २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोन अँड्राइड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. यात ९० हर्ट्जसह ६.५५ इंच FHD+ डिस्प्ले मिळतो. ओप्पो रेनो ६ प्रमाणेच हा देखील ६४ मेगापिक्सल मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो शूटरसह ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट करेल. सेल्फीसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. तर पॉवरसाठी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. वाचाः Oppo Reno 6 स्पेसिफिकेशन्स Oppo Reno 6 मध्ये ६.४३ इंच FHD+ डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टो-कोर मीडियाटेक ६०० प्रोसेसर मिळू शकतो. तसेच १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजमायक्रोएसडी कार्डने वाढवू शकता. हा फोन अँड्राइड ११ वर चालतो. यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४३०० एमएएचची बॅटरी मिळेल. ओप्पो रेनो ६ ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. यात ६४ मेगापिक्सल मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळेल. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wFutqz