नवी दिल्लीः परदेशात जाण्यासाठी आता व्हॅक्सीनेशन सर्टिफेकेट खूपच गरजेचे झाले आहे. याच्यावरून सर्व देशातील नियम वेगवेगळे आहेत. तर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने कोविड १९ व्हॅक्सिनेशन वरून नवीन गाइडलाइन्स जारी केली होती. यावरून शिक्षण, जॉब किंवा टोकियो ओलिम्पिक खेळासाठी सहभागी होणाऱ्या लोकांसाठी आपल्या पासपोर्ट सोबत कोविड १९ व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटला लिंक करणे बंधनकारक असणार आहे. जर तुमच्यापैकी कुणाला शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी विदेशात जायचे असेल तर याची गरज पडू शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज या संबंधीची सर्व माहिती देत आहोत. कोविड १९ व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटला पासपोर्ट लिंक करू शकता. जाणून घ्या याची संपूर्ण प्रोसेस. वाचाः पासपोर्टला कोविड १९ व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटशी असे करा लिंक >> लिंक करण्यासाठी सर्वात आधी cowin.gov.in वेबसाइट जा. >> या ठिकाणी लॉगिन करून raise a issue च्या ऑप्शनला सिलेक्ट करा. >> हे केल्यानंतर या ठिकाणी पासपोर्ट ऑप्शन सिलेक्ट करा. >> या ठिकाणी ड्रॉप डाउन मेन्यू वरून पर्सनला सिलेक्ट करा. >> तसेच हे सर्व केल्यानंतर पासपोर्ट नंबर एंटर करा. >> आता शेवटी सर्व माहिती टाकून सबमिट करा. >> इतके केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला तुमचा पासपोर्ट लिंक सोबत नवीन कोविड १९ व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट मिळेल. या नवीन सर्टिफिकेटला तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करू शकता. वाचाः पासपोर्ट आणि सर्टिफिकेट मध्ये सारखीच डिटेल्स असायला हवी व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट मध्ये पासपोर्ट नंबर लिंक करण्यासाठी कँडिडेटची डिटेल्स सेम असायला हवी. जर समजा, सर्टिफिकेट मध्ये तुमचे नाव चुकीचे असेल किंवा याच्या पोर्टल वर जाऊन ते करेक्ट करू शकता. परंतु, हे लक्षात ठेवावे लागेल की, नाव बदलण्याचा ऑप्शन फक्त एकदा मिळतो. त्यामुळे हे काळजीपूर्वक करा. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kgZ0sc