Full Width(True/False)

नवरा असावा तर असा! सिद्धार्थ चांदेकरची मितालीसाठी खास पोस्ट

मुंबई: अभिनेता आणि अभिनेत्री ही मराठी सिनेइंडस्ट्रीमधली चर्चेतली जोडी. दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघांचे क्सुट आणि रोमॅंन्टिक फोटोही व्हायरल होतात. काही महिन्यांपूर्वीच दोघं विवाहबंधनात अडकले. नवरा बायकोच्या या नात्यातला गोडवा सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धार्थनं मितालीसाठी खास अशी पोस्ट शेअर केली आहे. ' तुझी प्रत्येक गोष्ट आवडते. तू हसत असताना तुझ्याकडे पाहायला फार आवडतं. पाणी पिता पिता चुकून अंगावर सांडलं की एक केविलवाणा चेहरा करतेस...तो खूप आवडतो, तंद्रीत असताना काहीतरी विसरलेलं अचानक आठवतं तुला...ते सांगताना जो उत्साह असतो तो खूपआवडतो',असं सिद्धार्थ त्याच्या पोस्टमध्ये लिहितो. कुणी तुझी मस्करी केली की, एक बिचारा रुसलेला चेहरा करते...तो तर खूप आवडतो. मी बोलत असताना टक लावून बघतेस तेव्हा शब्द विसरूनंच जातो एकदम...कारण बोलण्यापेक्षा ते डोळे बघत राहायला फार आवडंत. साडी नेसून, टिकली वैगेरे लावून तर येऊच नको माझ्या , समोर बाकी कशातंच लक्ष लागत नाही. एवढं करून कशी दिसतेय मी? हे मला विचारतेस? कसं उत्तर देऊ गं...अशी सुंदर पोस्ट सिद्धार्थनं मितालीसाठी लिहिली आहे. सिद्धार्थनं लिहिलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हॅलेंन्टाइन्स डेच्या दिवशी सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा पार पडला होता. तर काही महिन्यांपूर्वी पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीनं सिद्धार्थ-मितालीचा विवाह पार पडला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36iQVea