Full Width(True/False)

'पॉर्न' व्हिडीओ निर्मिती प्रकरणात नवऱ्याला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीनं घेतला मोठा निर्णय

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीची आणखी एक काळी आणि धक्कादायत बाजू आता समोर आली आहे. वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच टीव्ही मालिकांमध्ये काम देतो असे सांगून तरुणींचे 'पॉर्न' व्हिडीओ बनविणारी प्रोडक्शन कंपनी चालविल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री हिचा पती व्यावसायिक राज कुंदा याला सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पतीला अटक झाल्यानंतर शिल्पां एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'सुपर डान्सर' या रिअॅलिटी शोमध्ये शिल्प परिक्षक म्हणून काम पाहात आहे. प्रत्येत सोमवारी आणि मंगळवारी या शोचं शूटिंग करण्यात येतं. पण पतीला अटक झाल्यानंतर शिल्पानं आज शूटिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून पॉर्न प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी धड टाकली त्यावेळी एका अश्लील व्हिडिओचे चित्रीकरण सुरु होते. पोलिसांनी बंगल्यातून बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित अभिनेता, फॅशन डिझायनर आणि कॅमेरामन यांना अटक केली. हिंदी आणि तेलगू सिनेमा आणि विशेषकरून जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या गेहाना वसिष्ठ हिचा सहभाग यामध्ये आढळल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली. तेव्हापासून गुन्हे शाखा या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करीत होती. हे अश्लील चित्रपट आणि वेब सिरीज बनविण्यासाठी अर्थपुरवठा याच्याकडून होत असल्याचा संशय पोलिसांना होता. याबाबतचे ठोस पुरावे हाती लागल्यानं कुंद्रा याला अटक करीत असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36RXnsM