Full Width(True/False)

हृतिक- कियाराचं नक्की चाललंय तरी काय? फोटोमुळे आले चर्चेत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. सोशल मीडियावरच नाही तर देशात आणि परदेशातही हृतिकचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. अशात त्यानं शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा झाली नाही तर नवलच. आताही काहीसं असंच झालंय. हृतिकनं त्याच्या सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे पण या फोटोमध्ये त्यानं अभिनेत्री कियारा आडवाणीला टॅग केलं आहे. ज्यामुळे चाहतेही गोंधळले आहेत. हृतिक रोशननं त्याचा एक कूल फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि या फोटोला त्यानं दिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणीला टॅग करताना हृतिकनं लिहिलं, 'हे कियारा, हे ठीक दिसतंय असं तुला वाटतं का?' हृतिच्या याच कॅप्शननं सर्वांना गोंधळात टाकलं आहे. या दोघांचं नक्की चाललंय तरी काय असा सूर काही चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. तर काहींना वाटतंय की, हृतिक कियारा आगामी काळात एकत्र चित्रपट करणार आहेत. अर्थात हे नंतर समजंल की हृतिक रोशनची ही पोस्ट इ-कॉमर्स साइट 'मिंत्रा'च्या जाहिरातीचा एक भाग आहे. ज्यात या वेबसाइटनं हृतिक रोशन, यांच्यासोबत विजय देवरकोंडा, सामंथा अक्किनेनी आणि दुलकर सलमान यांची इंडियाचे फॅशन आयकन्स म्हणून निवड केली आहे. हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो पहिल्यांदा अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत 'फायटर' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. याशिवाय हृतिककडे 'विक्रम वेधा' रीमेक आणि 'क्रिश ४' हे चित्रपट आहेत. तर कियारा आडवाणी आगामी काळात 'शेरशाह', 'भूल भुलैया २', 'जुग जुग जियो' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rKlwet