Full Width(True/False)

'या' गेमच्या माध्यमातून राज कुंद्रानं गरीबांना फसवलंय, राम कदमांचा गंभीर आरोप

मुंबई: अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. भाजप भाजप आमदार यांनी राजवर खळबळजनक आरोप केले आहेत. राम कदम यांनी राज कुंद्रावर ऑनलाइन गेमच्या माध्यमातून गरीब जनतेला गंडा लावल्याचा आरोप केला आहे. गेम गॅम्बलींग (ऑनलाइन जुगार) द्वारे राजने २५०० ते ३००० कोटींचा घोटाळा वियान कंपनीच्या माध्यमातून केल्याचं राम कदम यांनी आरोप करताना म्हटलं आहे. राज कुंद्राच्या विआन आणि जेएल स्ट्रीम या दोन कंपन्या आहेत. यातील विआन इंटरप्राइजेज या कंपनीनं GOD () या नावाचा ऑनलाइन गेम लॉन्च केला होता. राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीनं या गेमचं प्रमोशन केलं होतं. हा गेम सरकारमान्य असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. गेमनध्ये जिंकणाऱ्या मोठ्या रकमेची आमिषं दाखवण्यात आली होती. या पद्धतीनं विआन कंपनीनं अनेकांना फसवलं आहे. असा आरोप राम कदम यांनी केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VkpKxo