नवी दिल्लीः विवो आपल्या डिझाइन आणि चांगल्या कॅमेऱ्यासाठी ओळखले जातात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कंपनीने बजेट सेगमेंट मध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केले नाहीत. जर तुम्हाला १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत विवोचे स्मार्टफोन खरेदी करायचे असतील तर तुम्हाला यासंबंधी डिटेल्स माहिती देत आहोत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मोठा डिस्प्ले, स्ट्राँग बॅटरी आणि बॅक पॅनेलवर ड्युअल कॅमेरा सेटअप असे फीचर्स मिळतील. वाचाः विवो वाय १२ एस विवोच्या या फोनला फ्लिपकार्टवरून १० हजार ४९० रुपयांत विकले जात आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने ५ टक्के डिस्काउंट नंतर या फोनला १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. विवोच्या या फोनमध्ये ६.५१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिले आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः विवो वाय ११ विवोच्या या फोनला ९ हजार ४९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये ६.३५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः विवो वाय ९१ आय विवोच्या या फोनची किंमत ७ हजार ९९० रुपये आहे. या फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. सोबत या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये ४०३० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः विवो वाय१ एस या फोनला फ्लिपकार्टवर ८ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६.२२ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी ४०३० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dH2NL8