नवी दिल्ली. युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवरून ४५ रुपयांचा प्लान काढून टाकला आहे. हा प्लान आता कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या रिचार्ज प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. तसेच, ९१ मोबाइलच्या दाव्यानुसार कंपनीने ४५ रुपये तसेच ४९ रुपयांचा रिचार्ज प्लान थांबविला आहे. असे असले तरी, हे किमान रिचार्ज पॅक बंद करण्याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वाचा: एअरटेल ४५ रुपयांचा प्लान कंपनीच्या या किमान प्लानमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता देण्यात येत होती. यात वापरकर्त्याला कोणत्याही प्रकारचा टॉकटाइम मिळत नाही. या प्लानमध्ये इंटरनेट चालविण्यासाठी वापरकर्त्याला १०० MB डेटाचा लाभ मिळायचा. हा प्रीपेड प्लान विशेषत: अशा लोकांसाठी होता ज्यांना त्यांचा नंबर बंद करायचा नव्हता, म्हणजेच या रिचार्ज नंतर वापरकर्त्याच्या नंबरवर इनकमिंग कॉलची सुविधा उपलब्ध होती. एअरटेल ४९ रुपयांचा प्लान एअरटेलचा हा प्रीपेड प्लान केवळ इनकमिंग कॉलसाठी वापरला जायचा. यात वापरकर्त्याला २८ दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर आउटगोइंग कॉलसाठी ३८.५२ रुपयांचा टॉकटाइम आणि १०० एमबी डेटा उपलब्ध आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे, ज्यामध्ये इनकमिंग सुविधा उपलब्ध आहे. इतर स्मार्ट रिचार्ज प्लान या व्यतिरिक्त कंपनी ७९ आणि १२८ रुपयांच्या प्रीपेड प्लासह २८ दिवसांची वैधताही देत आहे. ७९ रुपयांच्या प्रीपेड योजनेत वापरकर्त्याला ६४ रुपये टॉकटाइम आणि २०० एमबी डेटाचा लाभ मिळतो. त्याचबरोबर, १२८ रुपयांच्या योजनेत वापरकर्त्याला केवळ २ दिवसांच्या वैधतेचा लाभ मिळतो. या प्लानमध्ये कोणताही टॉकटाइम किंवा डेटा ऑफर केला जात नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AtU6h1