मुंबई टाइम्स टीम टीव्ही हे प्रयोगशील माध्यम आहे. चोवीस तास दिसणाऱ्या या माध्यमात सतत नवनवीन प्रयोग करणं गरजेचं असतं. म्हणूनच वैविध्यपूर्ण विषयांच्या मालिका आल्या. रिअॅलिटी शो सुरू झाले. कथाबाह्य कार्यक्रमांचा ट्रेंड लोकप्रिय झाला. नवीन तरुण चेहऱ्यांनासुद्धा या माध्यमानं संधी दिली. आता टीव्हीविश्वावर आणखी एक नवीन ट्रेंड दिसतोय. काही कार्यक्रमांमध्ये लोकप्रिय कलाकार दिसून येताहेत. तर आगामी काही कार्यक्रमांमध्ये आणखी मोठे कलाकार दिसून येणार आहेत. , , , , हे प्रस्थापित चेहरे लवकरच विविध कार्यक्रमांमधून झळकणार आहेत. सध्या मनोरंजनविश्व काहीसं थंडावलं आहे. त्यातल्या त्यात टीव्ही माध्यमातच काही ना काही घडताना दिसतंय. त्यामुळे बरेचसे प्रयोग तिथे केले जाताहेत. एरव्ही सिनेमा, वेब सीरिजमध्ये दिसणारे चेहरे अलीकडे टीव्हीवर झळकू लागले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सई ताम्हणकर आणि प्रसाद ओके हे कलाकार गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या दरम्यान मोठ्या पडद्यावर त्यांचे सिनेमेही आले. पण ते या कार्यक्रमात विनोदवीरांना प्रोत्साहन देतानाही दिसले. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या नव्या रुपात अभिनेता स्वप्निल जोशी सहभागी झाला आणि आता तर तो काही प्रहसनांमध्येही सामील होऊ लागला आहे. नुकताच सुरु झालेला 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिसून आली. तिच्या उत्स्फुर्ततेमुळे दोन आठवड्यांतच तिनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. येत्या दिवसांत सुरू होणाऱ्या कार्यक्रमांमध्येही हा ट्रेंड दिसणार आहे. मुक्ता बर्वे-उमेश कामत ही जोडी 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत. ही जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसणार आहे. '' या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर त्याच मालिकेच्या निमित्तानं अभिनेता भूषण प्रधान बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस' या लोकप्रिय कार्यक्रमाची पहिली झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. त्यानंतर त्याविषयी बरीच चर्चाही झाली. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर पुन्हा एकदा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'कोण होणार करोडपती'मध्ये सचिन खेडेकरसुद्धा सूत्रसंचालन करणार आहेत. त्यांनी याआधी या कार्यक्रमाच्या एका पर्वाचं सूत्रसंचालन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना त्या खुर्चीत बघण्यास चाहते उत्सुक आहेत. सिनेमागृहं सध्या बंद असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत. तसंच कडक निर्बंधांमुळे सिनेमांचं चित्रीकरणही ठप्प आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर काम करणारे प्रस्थापित कलाकार टीव्ही माध्यमाकडे वळत असल्याचं बोललं जातंय. लोकप्रिय प्रस्थापित कलाकार मालिका, कार्यक्रमांमधून दिसणार असल्यानं प्रेक्षकांसाठी मात्र ही मेजवानी ठरली आहे. या कलाकारांचा चाहतावर्ग मोठा असतो. त्यामुळे त्यांनी टीव्हीवर झळकणं हे वाहिन्यांसाठीदेखील फायद्याचंच असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. प्रसिद्ध कलाकार टीव्हीवर झळकण्यामागे अनेक व्यावसायिक कारणं असली तरी प्रेक्षकांसाठी मात्र ती पर्वणीच ठरली आहे. यानिमित्तानं येत्या दिवसांत या बड्या कलाकारांमध्ये चुरस दिसून आली तर नवल वाटायला नको. लवकरच लोकप्रिय चेहरे दिसणार... सचिन खेडेकर - कोण होणार करोडपती महेश मांजरेकर - बिग बॉस मराठी अजिंक्य देव - जय भवानी जय शिवाजी उमेश कामत - अजूनही बरसात आहे मुक्ता बर्वे - अजूनही बरसात आहे भूषण प्रधान - जय भवानी जय शिवाजी
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ySp7Kb