Full Width(True/False)

जबरदस्त फीचर्ससह लाँच झाली Timex Helix Smart 2.0 स्मार्टवॉच, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली : Helix Smart 2.0 भारतात लाँच झाली असून, यात टेंप्रेचर सेंसर, हार्ट रेट सेंसर आणि मल्टीपल वॉच फेस देण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये स्क्वेअर डायल देण्यात आली आहे. वॉचला ५ कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. कंपनीचा दावा आहे की बॅटरी ९ दिवस टिकेल. यात १० वेगवेगळे स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहे. वॉच खरेदी करणाऱ्यांना एक महिन्याचे DocOnline चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. वाचाः ची किंमत Timex Helix Smart 2.0 ची किंमत ३,९९९ रुपये आहे. याची विक्री इंडियावरून प्राइम डे सेलमध्ये होईल. वॉचला ब्लॅक, ब्लॅक मेश, ग्रीन, ग्रीन रोज मेश आणि व्हाइट रंगात खरेदी करू शकता. Timex Helix Smart 2.0 चे फीचर्स Timex Helix Smart 2.0 मध्ये १.५५ इंच कलर डिस्प्ले मिळतो, यात टचस्क्रीन सपोर्ट देण्यात आला आहे. यात उजव्या बाजूला एक फिजिकल बटन मिळेल. तसेच, बॉडी टेंप्रेचर मॉनटरिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे फीचर्स यात मिळतील. याची बॅटरी ९ दिवसांचा बॅकअप आणि स्टँडबाय टाइम १५ दिवसांचा असल्याचा कंपनीचा दावा आहे. वॉच फक्त तीन तासात फूल चार्ज होते. वाचाः Helix Smart 2.0 मध्ये १० स्पोर्ट्स मोड आहेत. यात ट्रेडमिल, बास्केटबॉल, योग, फुटबॉल यांचा समावेश आहे. वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी वॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. अ‍ॅपद्वारे २० पेक्षा अधिक वॉच फेसचा वापर करता येईल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3B1ptQw