Full Width(True/False)

ऑस्करकडून विद्या बालनला मोठा मान, ठरली पहिलीच भारतीय अभिनेत्री

मुंबई: कान फिल्म फेस्टिव्हलसाठी ज्युरी मंडळामध्ये निवड झाल्यानंतर अभिनेत्री विद्या बालनचा आता ऑस्करच्या कमिटीमध्ये स्थान मिळालं आहे. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅंड सायन्सच्या वतीनं हिला कमिटी सहभागी होण्यासाठी निमंत्रण आलं आहे. विशेष म्हणजे या वर्षी एकूण ३९५ कलाकार, निर्माते , दिग्दर्शक , तंत्रज्ञ यांना ऑस्करनं त्यांच्या कमिटीमध्ये सामाविष्ट केलं आहे. नियामक मंडळात सदस्य होण्यासाठी ऑस्करकडून निमंत्रण आलेली विद्या बालन एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे. त्यामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मानांकन मिळालेल्या सिनेमांसाठी मतदान करण्याचा अधिकार विद्याला आता मिळणार आहे. विद्यासोबतच निर्माता आणि यांनाही ऑस्करनं त्यांच्या नियमन मंडळात सदस्य होण्यासाठी निमंत्रण पाठवलं आहे. यापूर्वी दिवंगत वेशभूषाकार भानू अथैया, अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए.आर, रेहमान, साऊंट डिझायनकर रसूल पूकुट्टी हे दिग्गज ऑस्करच्या नियामक मंडळातील सदस्य होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Anetws